Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरन्यायाधीश होणार उदय लळीत…वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश…आता ७४ दिवसांसाठी सरन्यायाधीश!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uday lalit

मुक्तपीठ टीम

न्यायमूर्ती यू यू लळीत यांची सरन्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन.व्ही रमणा हे येत्या २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी न्यायमूर्ती यू यू लळीत यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश म्हणून केली आहे. लळीत हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. न्यायमूर्ती लळीत यांचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असेल आणि ते ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.

मूळचे महाराष्ट्राचे असलेले न्यायमूर्ती लळीत यांना ऑगस्ट २०१४ मध्ये थेट वकिलावरून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्यात आले. त्यांचे वडील मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिले आहेत. ते तिहेरी तलाक रद्द करणाऱ्या खंडपीठाचे सदस्य आहेत. जानेवारी २०१९ मध्ये, न्यायमूर्ती लळीत यांनी स्वतः अयोध्येतील रामजन्मभूमी वादाचा निकाल देणाऱ्या घटनापीठातून माघार घेतली. १९९७ मध्ये या प्रकरणात यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे वकील होते, त्यामुळे ते या खंडपीठाचा भाग नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

पीएफ/पेन्शन फंड प्रकरणाची सुनावणी

न्यायमूर्ती लळीत सध्या पगारातून पीएफ/पेन्शन फंड कपातीची मर्यादा वाढवण्याविरुद्ध EPFO ​​च्या याचिकांवर सुनावणी करत आहेत.

तत्पूर्वी, न्यायमूर्ती लळीत यांनी एप्रिलमध्ये एक निकाल दिला होता, ज्यामध्ये त्यांनी चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या फिरोज (३५) याला फाशीची शिक्षा माफ करून २० वर्षांची शिक्षा ठोठावली होती. प्रत्येक गुन्हेगाराला भविष्य असते. नंतर महिला संघटनांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली, पण त्यांनीही ती फेटाळली.

प्रलंबित प्रकरणे आणि न्यायाधीशांची रिक्त पदे

न्यायमूर्ती लळीत २६ ऑगस्ट रोजी देशाच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारतील तेव्हा सर्वोच्च न्यायालयात ७२ हजार खटले आणि न्यायाधीशांच्या चार जागा रिक्त असतील. न्यायमूर्ती लळीत हे कॉलेजियमचे अध्यक्ष असतील आणि उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील रिक्त पदे भरण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सध्या देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये ३८० न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत.


Tags: CJIJustice Uday Lalituday lalitउदय लळीतन्यायमूर्ती लळीतसर्वोच्च न्यायालय न्यायाधीश
Previous Post

गुजरातेत जनावरांच्या लम्पी त्वचारोगाचा फैलाव! महाराष्ट्रात प्रादूर्भाव रोखण्यासाठी वाचा ‘या’ सूचना…

Next Post

सकल मराठा समाजाचं मिशन मराठा व्होट बँक! “मुख्यमंत्री शिंदे मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करा, चिंतामुक्त व्हा!”

Next Post
Maratha Reservation

सकल मराठा समाजाचं मिशन मराठा व्होट बँक! “मुख्यमंत्री शिंदे मराठ्यांच्या ओबीसीत समावेश करा, चिंतामुक्त व्हा!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!