Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अग्निपथ आगडोंब : अग्निवीरांना सेवापश्चात लाभासाठी त्यांच्या पगारातूनच होणार कपात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
AgiPath Scheme

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेविरोधात देशाच्या अनेक भागांमध्ये आगडोंब उसळला आहे. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरकारने काही बदल करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचवेळी भाजपा समर्थकांकडून अग्निवीरांना चार वर्षांनंतर सेवामुक्त झाल्यावर मिळणाऱ्या १२ लाखांच्या लाभाची वेगळी बाजू समोर आली आहे. ही रक्कम सरकारकडून वेगळा विशेष लाभ म्हणून दिली जाणार नाही. तर अग्निवीरांच्या मासिक वेतनातून कापलेल्या रकमेत सरकारचा सहभाग मिळवून तयार होणार असल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे या अग्निपथचा स्वीकार करणाऱ्या तरुणांना किती पगार दिला जाईल आणि निवृत्तीनंतर त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत त्याची माहिती घेवूया…

चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना काय मिळणार?

  • चौथ्या आणि अंतिम वर्षात अग्निवीरांचा एकूण पगार आणखी वाढून ४० हजार रुपये होईल.
  • चौथ्या वर्षात अग्निवीरांना दरमहा २८ हजार रुपये मिळतील, उर्वरित १२ हजार रुपये सेवा निधीत जमा केले जातील.
  • अशाप्रकारे, संपूर्ण चार वर्षांच्या सेवा निधी पॅकेजमधील प्रत्येक अग्निवीरचे योगदान ५.०२ लाख रुपये असेल.
  • सरकार स्वतःच्या वतीने ५.०२ लाख रुपये निधीमध्ये जमा करणार आहे.
  • अशाप्रकारे, चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अग्निवीरांना एकरकमी १०.०४ लाख रुपये मिळतील.

सरकारकडून अग्निवीरांना इतर फायदेही देणार आहे

  • सेवानिधी निधीत जमा झालेल्या रकमेवरही व्याज भरणार आहे.
  • व्याजाचा दर EPFO ​​च्या पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजाइतका असेल.
  • अग्निवीरांच्या पगारातून पीएफची कपात होणार नाही.
  • सर्व्हिस फंडाच्या एकरकमी पेमेंटवर देखील आयकर भरावा लागणार नाही.
  • अग्निवीरांच्या मूळ वेतनावर आयकर कायदे लागू होतील.

अग्निवीरांना सेवापश्चात लाभांसाठी मासिक पगारातून होणार कपात!

  • अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना दरमहा ३० टक्के पगार कापला जाईल.
  • अग्निवीरांचा पहिल्या वर्षी एकूण पगार ३० हजार रुपये असेल.
  • यापैकी सेवा निधीसाठी ३० टक्के म्हणजेच ९ हजार रुपये कापले जातील.
  • अशाप्रकारे अग्निवीरांचा पगार पहिल्या वर्षी २१ हजार रुपये होईल.
  • सेवा निधीमध्ये जमा करावयाची रक्कम चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एकरकमी दिली जाईल.
  • दुसऱ्या वर्षी अग्निवीरांच्या पगारात १० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
  • त्यामुळे दुसऱ्या वर्षी एकूण पगार ३३ हजार रुपये होणार आहे.
  • यापैकी ९,९०० रुपये सेवा निधी फंडात जातील आणि अग्निवीरांना दरमहा २३ हजार १०० रुपये मिळतील.
  • तिसऱ्या वर्षी या तरुणांचा एकूण पगार ३६,५०० रुपये होईल. यापैकी १० हजार ९५० रुपये सेवा निधीसाठी असतील आणि हातात २५ हजार ५५० रुपये येतील.

Tags: AgnipathAgniveerIndiapensionRetirement Pensionअग्निपथ आगडोंबअग्निवीरसेवापश्चात लाभ
Previous Post

अर्थमंत्रालयाचे काटकसरीचं धोरणं: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वस्त विमान प्रवासाचा आग्रह!

Next Post

पेगासस झालं, आता हर्मिट! राजकीय नेते, कॉर्पोरेट, पत्रकार यांच्या मोबाइल हेरगिरीसाठी वापर!

Next Post
Spyware Hermit

पेगासस झालं, आता हर्मिट! राजकीय नेते, कॉर्पोरेट, पत्रकार यांच्या मोबाइल हेरगिरीसाठी वापर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!