मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेविरोधात देशाच्या अनेक भागांमध्ये आगडोंब उसळला आहे. त्यामुळे सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरकारने काही बदल करून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याचवेळी भाजपा समर्थकांकडून अग्निवीरांना चार वर्षांनंतर सेवामुक्त झाल्यावर मिळणाऱ्या १२ लाखांच्या लाभाची वेगळी बाजू समोर आली आहे. ही रक्कम सरकारकडून वेगळा विशेष लाभ म्हणून दिली जाणार नाही. तर अग्निवीरांच्या मासिक वेतनातून कापलेल्या रकमेत सरकारचा सहभाग मिळवून तयार होणार असल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे या अग्निपथचा स्वीकार करणाऱ्या तरुणांना किती पगार दिला जाईल आणि निवृत्तीनंतर त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत त्याची माहिती घेवूया…
चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना काय मिळणार?
- चौथ्या आणि अंतिम वर्षात अग्निवीरांचा एकूण पगार आणखी वाढून ४० हजार रुपये होईल.
- चौथ्या वर्षात अग्निवीरांना दरमहा २८ हजार रुपये मिळतील, उर्वरित १२ हजार रुपये सेवा निधीत जमा केले जातील.
- अशाप्रकारे, संपूर्ण चार वर्षांच्या सेवा निधी पॅकेजमधील प्रत्येक अग्निवीरचे योगदान ५.०२ लाख रुपये असेल.
- सरकार स्वतःच्या वतीने ५.०२ लाख रुपये निधीमध्ये जमा करणार आहे.
- अशाप्रकारे, चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अग्निवीरांना एकरकमी १०.०४ लाख रुपये मिळतील.
सरकारकडून अग्निवीरांना इतर फायदेही देणार आहे
- सेवानिधी निधीत जमा झालेल्या रकमेवरही व्याज भरणार आहे.
- व्याजाचा दर EPFO च्या पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणाऱ्या व्याजाइतका असेल.
- अग्निवीरांच्या पगारातून पीएफची कपात होणार नाही.
- सर्व्हिस फंडाच्या एकरकमी पेमेंटवर देखील आयकर भरावा लागणार नाही.
- अग्निवीरांच्या मूळ वेतनावर आयकर कायदे लागू होतील.
अग्निवीरांना सेवापश्चात लाभांसाठी मासिक पगारातून होणार कपात!
- अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या तरुणांना दरमहा ३० टक्के पगार कापला जाईल.
- अग्निवीरांचा पहिल्या वर्षी एकूण पगार ३० हजार रुपये असेल.
- यापैकी सेवा निधीसाठी ३० टक्के म्हणजेच ९ हजार रुपये कापले जातील.
- अशाप्रकारे अग्निवीरांचा पगार पहिल्या वर्षी २१ हजार रुपये होईल.
- सेवा निधीमध्ये जमा करावयाची रक्कम चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एकरकमी दिली जाईल.
- दुसऱ्या वर्षी अग्निवीरांच्या पगारात १० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.
- त्यामुळे दुसऱ्या वर्षी एकूण पगार ३३ हजार रुपये होणार आहे.
- यापैकी ९,९०० रुपये सेवा निधी फंडात जातील आणि अग्निवीरांना दरमहा २३ हजार १०० रुपये मिळतील.
- तिसऱ्या वर्षी या तरुणांचा एकूण पगार ३६,५०० रुपये होईल. यापैकी १० हजार ९५० रुपये सेवा निधीसाठी असतील आणि हातात २५ हजार ५५० रुपये येतील.