Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मोदी सरकारच्या बँकांचे महाराष्ट्रात फक्त १० टक्के पीककर्ज वाटप!”

६० टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी कोरोना काळात थकीतदार

September 6, 2026
in व्हा अभिव्यक्त!
0
pm modi

किशोर तिवारी / व्हा अभिव्यक्त!

एकीकडे मागील दोन वर्षात कर्जबुडव्या भांडवलदारांना सुमारे २२ लाख कोटीचे पॅकेज दिले मात्र भारताची अर्थ व्यवस्था रुळावर ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज पुनर्वसन व आर्थिक मदतीचे ठोस पॅकेज दिले नाही त्यातच ३१ मे पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी करा असा आदेश राज्य सरकारने वारंवार दिल्यानंतरही केंद्र सरकारच्या दबावाखाली सर्व सार्वचनिक क्षेत्रातील सरकारी बँकानी दिलेल्या लक्ष्याच्या फक्त १० टक्के पात्र शेतकऱ्यांनाच नवीन पीककर्ज दिले आहे त्यामुळे पीक पात्र असतांना ताटकळत ठेवलेले व थकीत असलेले सुमारे ९० टक्के शेतकरी सरकारी बिनव्याजी कर्जापासुन वंचित राहतील व सावकारांच्या दारावर जाऊन दामदुपटीने कर्ज घेऊन आत्महत्या करतील अशी भीती आहे.

 

यावर्षी केंद्र सरकारच्या दबावाखाली सर्व सार्वचनिक क्षेत्रातील सरकारी बँकाना २० हजार कोटीचे वाटप जेमतेम २ हजार कोटीचे वाटप केले यातील बहुतेक वाटप पश्चिम महाराष्ट्रात असुन विदर्भ मराठवाड्यात व खान्देश उत्तर महाराष्ट्रात फक्त ६ टक्के वाटप झाल्याने यावर्षी जर मायक्रो फायनान्स वा कृषी केंद्र चालविणाऱ्या सावकारांनी दाम दुपट्टीने पेरणी करावी लागेल वा शेती पेरणीविना सोडावी लागेल अशी भीती व्यक्त करतांना हजारो शेतकऱ्यांना दोन्ही पीक कर्ज माफीची तर सर्व नियमित शेतकऱ्यांना घोषीत झालेली पन्नास हजाराची रक्कम खात्यात जमा न झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. यावर्षी उन्हाळी भुईमूग बुडयाल्याने तसेच पिकविम्याची रक्कम फारच तोटकी मिळाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात शेतकरी शेतमजुरांवरच आली असुन प्रत्येक कुटुंबात याचा फटका बसला आहे व औषध दवाखान्याची खुली लुट ग्रामीण क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या कंगाल करून गेली आहे मात्र केन्द्र सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे एक दमडीही देण्यास तयार नसल्याची खंत आहे.

 

मागील सात वर्षात जी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश ,उत्तरप्रदेशासह महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या पीककर्ज माफीची सहकारी व सरकारी बँकांनी २००८च्या कृषी कर्जमाफीचे तीनतेरा करण्याच्या आपल्या धोरणाची पुर्णरावृत्ती केली असुन नवीन पीककर्ज पुरवडा देण्यास शेतकऱ्यांचा अतोनात छळ आजही सुरुच असुन मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचा हवाल देत बँकांच्या आसुडाची यादीच आपणद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे सादर केली आहे बँकांना पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची विनंती केली आहे कारण केंद्र सरकारने बँकांचे कृषी पतपुरवडा गरज असुन जर सरकारचा या गंभीर समस्येकडे कडे लक्ष व हस्तक्षेप लवकर झाला नाहीतर आर्थिक संकटात असलेले लाखो पीककर्जवंचित शेतकरी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्यांचा मार्गांवर जातील हे सत्य नाकारता येत नाही . कृषी कर्ज व कर्जमाफीचा घोळ दूर करण्यासाठी विद्यमान एका ऐवजी पाच वर्षे ‘पीक कर्ज धोरण आणण्यासाठी सरकारने विषेय पत धोरण सुरु करण्याचा सल्ला आहे.

 

सर्व शेतकऱ्यांना चार टक्के दराने पीक कर्जासाठी व्याज दर कमी करून औपचारिक क्रेडिट प्रणाली पलीकडे जाणे गरजेचे आहे एका ऐवजी पाच वर्षे ‘पीक कर्ज धोरण आणताना या पाच वर्षात ह्या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणाचा ,मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा व कठीण आजारावरील खर्चाचा समावेश करण्याची सूचना सह प्रत्येक वर्षी खरीप हंगामात ३० एप्रिल पूर्वी पिक कर्ज वाटपाची अंतिम तारीख असावी असा नियम करण्यात यावा.सतत नापिकीमुळे होणारे नुकसान व पत पुरवठ्यामध्ये होणारा खंड यासाठी शेतकऱ्यांना कायम स्वरूपी वाचविणारी विमा व्यवस्था देण्यासाठी अनेक उपाय राज्य सरकारला सादर अहवालात देण्यात आले आहेत .”एक एकात्मिक क्रेडिट-कम-पीक-पशुधन मानवी आरोग्य विमा पॅकेज विकसित करणे आवश्यक आहे आणि पीक विमा संरक्षण संपूर्ण राज्य आणि कमी प्रीमियम सर्व पिके कव्हर करणे योग्य राहिल.

 

(किशोर तिवारी हे महाराष्ट्र सरकारच्या कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे प्रमुख आहे.)


Tags: farmerskishor tiwariMaharashtraकिशोर तिवारीकेंद्र सरकारपीककर्जमहाराष्ट्रशेतकरी
Previous Post

“लॉकडाऊन सोबत अर्थव्यवस्थेचाही आता विचार करा”

Next Post

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

Next Post
marine (1)

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!