Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तूर आयातीला वर्षभराची खुली मुदतवाढ मागे घ्या! किसान सभेची मागणी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
tur import

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने मुक्त तूर आयातीच्या धोरणाला आणखी वर्षभराची मुदतवाढ दिली आहे.  मागील वर्षी अशाच प्रकारे तूर आयातीचे मुक्त धोरण स्वीकारल्यामुळे देशात ८ लाख ६० हजार टन तुरीची आयात करण्यात आली होती. मुक्त आयातीमुळे देशांतर्गत तुरीचे भाव आधारभावाच्या खाली गेल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता. योग्य भाव मिळत नसल्याने देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर लागवडीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. सरकारने तूर आयातीचे हेच धोरण असेच पुढे रेटले तर आगामी काळात तूर उत्पादनाबाबत देशाचे इतर देशांवरील अवलंबित्व आणखी वाढणार आहे.

तुरीची देशांतर्गत गरज ४४ ते ४५ लाख टन इतकी आहे. गत वर्षी देशात तुरीचे चांगले उत्पादन झाले. गरजेच्या तुलनेत ४३ लाख ५० हजार टन तुरीचे उत्पादन झाले असताना तूर आयात करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र केंद्र सरकारने अशाही परिस्थितीत ८ लाख ६० हजार टन तूर आयात केली. परिणामी तुरीचे भाव कोसळले. गत वर्षी तुरीचा आधारभाव ६३०० रुपये असताना शेतकऱ्यांना आधारभावापेक्षा कमी दराने तूर विकावी लागली. भाव कमी मिळत असल्याने या वर्षी शेतकऱ्यांनी तूर लागवडीकडे पाठ फिरविणे सुरू केले. परिणामी या वर्षी तूर उत्पादन गत वर्षाच्या तुलनेत ४३ लाख ५० हजार टनांवरून ३२ ते ३५ लाख टनांपर्यंत खाली येणार आहे. किफायतशीर भाव न मिळाल्याने शेतकरी तूर उत्पादनाकडे पाठ फिरवत असल्याचा हा परिणाम आहे. केंद्र सरकारने तूर आयातीचे हे धोरण पुढेही असेच सुरू ठेवले तर देश तूर उत्पादनासाठी कायमचा परावलंबी होईल.

केंद्र सरकार, घोषणा आत्मनिर्भरतेच्या करत असले तरी प्रत्यक्ष कृती मात्र देशाला परावलंबी करणारी करत आहे. केंद्र सरकारच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी घटणार असून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने तूर आयाती बाबतचे हे धोरण तातडीने मागे घ्यावे. तूर आयातीला दिलेली खुली आयात परवानगी तातडीने रद्द करावी व तुरीचा वाढता उत्पादन खर्च पहाता शेतकऱ्यांना तुरीसाठी किमान ९००० रुपये भाव  मिळेल अशी धोरणे घ्यावीत अशी मागणी किसान सभा करत आहे.

डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, चंद्रकांत गोरखाना, संजय ठाकूर, डॉ. अजित नवले


Tags: Kisan SabhaOpen extensionTur Importकिसान सभाखुली मुदतवाढतूर आयात
Previous Post

फुटबॉलचे जादुगार पेले : चाहत्यांच्या मनाला चटका देत जीवनाचा डाव संपला…

Next Post

एसयु-३० एमकेआय (सुखोई) विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या श्रेणीची यशस्वी चाचणी

Next Post
Missile Launch

एसयु-३० एमकेआय (सुखोई) विमानातून जहाजाच्या लक्ष्यावर, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नव्या श्रेणीची यशस्वी चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!