मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटकपूर्व जामीनासाठी भाजपा नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. २३ फेब्रुवारीला नील सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांवर आरोप केले होते. ‘निकॉन इन्फ्रा’ कंपन्याच्या माध्यमातून जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात अनेक जमीन नील सोमय्यांनी घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील, असे विधानही राऊतांनी केले होते. मात्र एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नील सोमय्या अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले आहेत.अटकेपासून बचाव करण्यासाठी नील सोमय्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांनी सोमय्यांवर केलेले आरोप
- भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
- पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत.
- सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक आहे.
- त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत.
- त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत.
- हरित लवादानं अॅक्शन घेतली पाहिजे, तर त्यांच्यावर कारवाई होईल.
- वसईतील मौजे गोखिवरे येथे सोमय्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे.
- वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि लुबाडलं.
- आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले.
- कॅशही घेतली. १०० कोटी घेतले.
- लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या.
- ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांना केली, अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.
- या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.
- आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा.
- पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला २० कोटींचा निधी गेला.