मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केले मात्र हे पैसे राजभवनापर्यंत पोहोचलेच नाही, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याला तात्काळ किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी माझ्यावर अनेक आरोप केले मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करु इच्छितात, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली आहे.
सोमय्यांची प्रतिक्रिया!
- संजय राऊतांच्या आरोपाला किरीट सोमय्यांनी जोरदार उत्तर दिले.
- सोमय्या म्हणाले की, ईडीच्या कारवाईमुळे संजय राऊत गोंधळलेले आहेत.
- किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे.
- त्यांनी अनेक आरोप केले.
- मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत.
- ते फक्त टाइमपास करू इच्छितात.
- संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केलाय.
- ही कंपनी जानेवारी २०२१ मध्ये बनवली.
- दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोरोना कामे मिळवली, असा आरोप त्यांनी केला.
राऊतांनी काय आरोप केले?
- संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले.
- कोट्यवधी रुपये जमा केले.
- त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले.
- स्वतः किरीट सोमय्यांनी ५७ ते ५८ कोटी रुपये जमा केले.
- मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत.
- केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी.
- विक्रांतसाठी जमा केलेली रक्कम कुठे गेली, याचा छडा लावावा.
- आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी विक्रांतवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी देखील देणगी दिली आहे.
- या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी.
राजभवनाचे हे पत्र पुरावा नाही का? – संजय राऊत
- आपल्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात राऊतांनी पुरावे द्यावेत, सोमय्यांच्या आव्हानावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
- आयएनएस विक्रांत संदर्भात राजभवनात कोणताही निधी जमा झालेला नाही, असे पत्र आपल्याला राजभवनाच्या प्रशासकीय कार्यालयातून मिळाले आहे.
- राजभवनाचे हे पत्र पुरावा नाही का?
- तसेच, किरीट सोमय्या या पत्राला पुरावा म्हणत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही दवाखान्यातून आपला मेंदू, डोके फुकट चेक करून घ्यावे.
- तुम्ही दाखवता ते पुरावे आणि आम्ही दाखवतो ते शेंगदाण्याचे दाणे का.
संजय राऊतांनी आतापर्यंत सोमय्यांवर केलेले आरोप…
संजय राऊत यांनी आतापर्यंत किरीट सोमय्यांवर अनेक आरोप केले आहेत.
- सोमय्यांनी कोट्यवधी रुपये अमित शाहांना दिले.
- सोमय्यांनी पीएमसी बँकेच्या माध्यमातून ४२६ कोटींचा घोटाळा केला.
- सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याच्या बांधकाम कंपनीनेही कोट्यवधींचा घोटाळा केला.
- सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केले मात्र हे पैसे राजभवनापर्यंत पोहोचलेच नाही.