Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फॅक्ट नाही फेक! जाणून घ्या का झाली यूट्युब चॅनल्सवर कारवाई…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Fake News Channels 11

मुक्तपीठ टीम

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, २०२१ अंतर्गत विशेष तत्कालीन अधिकारांचा वापर करून,०४.०४. २०२२ रोजी बावीस (२२) यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन (३) ट्वीटर खाती, एक (१) फेसबुक खाते, एक (१) बातम्यांवर आधारीत संकेतस्थळ अवरोधित (ब्लॉक) करण्याचे आदेश जारी केले आहेत. ब्लॉक केलेल्या वाहिन्यांच्या दर्शकांची एकत्रित संख्या २६० कोटींहून अधिक होती, आणि त्यांचा वापर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील विषयांवर फेक न्यूज आणि सामाजिक माध्यमांवर समन्वितपणे चुकीची माहिती पसरवण्यासाठी केला जात होता.

fake channels

भारतीय यूट्यूब वृत्तवाहिन्यांवरील कारवाई

fake channels 2

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०२१ च्या अधिसूचनेनंतर प्रथमच यूट्यूब आधारित भारतीय बातम्या प्रसारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अलीकडील ब्लॉकिंग अधिसूचनेनुसार अठरा (१८) भारतीय यूट्यूब आणि चार (४) पाकिस्तान आधारित बातम्यांच्या वाहिन्यांना अवरोध केला गेला आहे.

 

मजकूराचे विश्लेषण

fake channels 3

भारतीय सशस्त्र दल, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर फेक न्यूज करण्यासाठी अनेक यूट्यूब वाहिन्यांचा वापर केला जात होता. ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आलेल्या मजकूरामध्ये पाकिस्तानमधून समन्वित पद्धतीने चालवल्या जाणार्‍या एकाहून अधिक सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरून पोस्ट केलेल्या काही भारतविरोधी मजकूराचाही समावेश आहे.

fake channels 4

युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याच्या उद्देशाने या यूट्यूब आधारित भारतीय वाहिन्यांवरून मोठ्या प्रमाणात खोटी माहिती प्रसारीत केली गेल्याचे आढळून आले आहे.

fake news channels 5

ब्लॉक केलेले भारतीय यूट्यूब चॅनेल्स काही टीव्ही न्यूज चॅनेलचे लोगो खोट्या लघुप्रतिमांचा वापर करत होत्या, ज्यात त्यांच्या वृत्तनिवेदकांच्या छायाचित्रांचाही समावेश होता, जेणेकरुन दर्शकांचा बातमी खरी असण्यावर विश्वास बसावा. आणि सामाजिक माध्यमांवरील मजकूराचा प्रसार वाढवण्यासाठी व्हिडिओचे शीर्षक आणि लघुप्रतिमा वारंवार बदलण्यात येत असत. काही प्रकरणांमध्ये तर या भारतविरोधी बनावट बातम्या पाकिस्तानमधून पद्धतशीरपणे येत होत्या असे देखील निदर्शनास आले.

fake channels 6

या कारवाईसह, डिसेंबर २०२१ पासून, मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि भारताची अखंडता, सार्वजनिक सुव्यवस्था इत्यादींशी संबंधित कारणास्तव ७८ यूट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि इतर अनेक सामाजिक माध्यम खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

fake news channels 7

भारत सरकार प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यमांचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना धोका पोहोचवण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे.

fake news channels 9


Tags: Fake Youtube ChannelsIndiaPakistanyoutubeफेक यूट्युब चॅनल्सभारत
Previous Post

आयएनएस विक्रांत निधी आरोप: “राऊत टाइमपास करतात, पुरावे असतील तर मुख्यमंत्र्यांना द्यावेत!” – किरीट सोमय्या

Next Post

#मुक्तपीठ #Live भाजपा ४२वा वर्धापन दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

Next Post
#मुक्तपीठ #Live भाजपा ४२वा वर्धापन दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

#मुक्तपीठ #Live भाजपा ४२वा वर्धापन दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!