Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मलिक, यशवंत जाधवांनंतर सोमय्याचं ठाकरे- सोनिया गांधी लक्ष्य!

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिग करणारा एकच माणूस, सोमय्यांचा गंभीर आरोप...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Somaiya

मुक्तपीठ टीम

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. किरीट सोमय्या हे शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी मनी लॉन्ड्रिग करणारा एकच माणूस आहे, असा गंभीर आरोप केला आहे.

 

ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले…

  • भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना म्हणाले की “यशवंत जाधव ज्या पद्धतीने मनी लॉन्ड्रिग करतात, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा परिवारही त्याच मार्गावार गेला आहे.
  • उद्धव ठाकरेंनी मे २०२० मध्ये निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतरच ही गोष्ट सुरु झाली.
  • विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करताना मालमत्ता दाखवताना उद्धव ठाकरेंनी १९ बंगले लपवले होते.
  • यामिनी जाधव यांनीही अर्ज सादर करताना कोट्यावधी रुपयांची मालमत्ता लपवली.
  • याची माहिती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी दिली.
  • अर्ज सादर केल्यानंतर आपोआप तो आयकर विभागाकडे जातो.
  • प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये मिळवले.
  • उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध यशवंत जाधव यांनी घोषित केले.

 

महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर!

  • “उदय शंकर महावार हा गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे.
  • सोनिया गांधी परिवाराचे मनी लॉन्डिरग करणारा उदय महावार आहे.
  • गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल.
  • त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मनपाचे फंड गोळा करणारे यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही.
  • सोनिया गांधीच्या नॅशनल हेरॉल्डमध्ये मनी लॉन्डिरग उदय शंकर महावारने केले आहे.
  • ज्या कंपनीला शेल कंपनी घोषित करण्यात आले त्यांना पैसे देऊन यशवंत जाधव यांच्या परिवाराने पैसे देऊन चेक घेतले आणि त्यावर तीन कंपन्या तयार करण्यात आल्या.

 

१५ कोटी रुपये यशवंत जाधव यांच्या खात्यामध्ये…

  • “उदय महावार यांनी सांगितलं आहे की, यशवंत जाधव यांचा माणूस पैसे द्यायचा.
  • ते आम्ही बॅंकेत टाकत होतो आणि तो व्यक्ती चेक घेऊन जात होता.
  • १५ कोटी रुपये यशवंत जाधव यांच्या खात्यामध्ये यायचे आणि त्याताली काही पैसा परदेशात पाठवण्यात आला.
  • ही माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली.
  • त्यानंतर सर्वांकडे गेले अनेक महिने आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत.
  • त्यानंतर आज कारवाई सुरु केली आहे.

Tags: CongressKirit Somaiyasoniya gandhiUday MahawarUddhav ThackerayYashwant Jadhavउदय महावारउद्धव ठाकरेकाँग्रेसकिरीट सोमय्यायशवंत जाधवसोनिया गांधी
Previous Post

संभाजीराजे छत्रपती २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार…मराठा आरक्षण उपसमितीची वर्षा बंगल्यावर बैठक!

Next Post

राज्यात ९७३ नवे रुग्ण, २ हजार ५२१  रुग्ण बरे!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात ९७३ नवे रुग्ण, २ हजार ५२१  रुग्ण बरे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!