Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्या सरकारी फाइली तपासू शकतात का? नवा वाद! सोमय्या म्हणतात कुणाला भीती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kirit Somaiya

मुक्तपीठ टीम

सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे नेते किरीच सोमय्या हे त्यांच्या कथित व्हायरल फोटोवरून वादात अडकले आहेत. या फोटोमध्ये सोमय्या मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासताना दिसत आहेत, यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. तर सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला.

 

सचिन सावंत

  • काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरुन टीका केली आहे.
  • ते म्हणाले की, “भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.
  • सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे.
  • महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे.
  • किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे.
  • जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी.
  • जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे.

 

सदर मंत्रीमंडळातील टिप्पणी ही पुढील बैठकीत इतिवृत्तांत जोपर्यंत मंजूर केली जात नाही तोपर्यंत माहिती अधिकारात उपलब्ध केली जाऊ शकत नाही व गोपनीय स्वरुपात मोडते. त्यामुळे या टिप्पणीला इतिवृतांतात मंजुरी मिळाली का? नसेल तर @KiritSomaiya यांना कशी मिळाली याची चौकशी झाली पाहिजे. https://t.co/vIAgAIftnM pic.twitter.com/GfKMXBzbXm

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 24, 2022

जितेंद्र आव्हाड

  • “नगरविकास खात्याने हे तपासून पहावं.
  • फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात.
  • जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही.
  • दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही म्हणाले.

 

आघाडी सरकारला भीती कसली आहे? सोमय्यांचा खोचक प्रश्न

  • आघाडी सरकारला भीती कसली आहे? कोणत्या कोणत्या फायली तपासल्या त्याची का? वायकरांची फाईल होती की सरनाईकांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटतं बहुतेक भीती ती आहे.
  • आम्हाला जगभरातून माहिती मिळत असते. वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते.
  • घोटाळेबाजांची माहिती मिळते.
  • उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती मिळत असते.
  • मी कुठेही जाणार, जातो. माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो.
  • आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्यावर धमक्यांचे, अब्रुनुकसानीचे अशा १३ केसेस लावल्या आहेत.
  • माझ्यावर माझ्या कुटुंबावर चौकश्या लावल्या आहेत.
  • आता आणखी एक चौकशी होऊन जाऊ दे.

Tags: Dr Jitendra AwhadKirit Somaiyasachin sawantकिरीट सोमय्याजितेंद्र आव्हाडनगरविकास खातेमंत्रालयसचिन सावंत
Previous Post

मतदान दिनानिमित्त लोकशाहीवरही बोलू काही तरी…

Next Post

काँग्रेस नेते शशी थरुरांचा भाजपाला टोला, २०१४च्याआधीच देशात नेताजींच्या नावाने १६४ संस्था!

Next Post
Shashi Tharoor

काँग्रेस नेते शशी थरुरांचा भाजपाला टोला, २०१४च्याआधीच देशात नेताजींच्या नावाने १६४ संस्था!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!