मुक्तपीठ टीम
सतत महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपाचे नेते किरीच सोमय्या हे त्यांच्या कथित व्हायरल फोटोवरून वादात अडकले आहेत. या फोटोमध्ये सोमय्या मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासताना दिसत आहेत, यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. तर सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला.
सचिन सावंत
- काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरुन टीका केली आहे.
- ते म्हणाले की, “भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.
- सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे.
- महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे.
- किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे.
- जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी.
- जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
सदर मंत्रीमंडळातील टिप्पणी ही पुढील बैठकीत इतिवृत्तांत जोपर्यंत मंजूर केली जात नाही तोपर्यंत माहिती अधिकारात उपलब्ध केली जाऊ शकत नाही व गोपनीय स्वरुपात मोडते. त्यामुळे या टिप्पणीला इतिवृतांतात मंजुरी मिळाली का? नसेल तर @KiritSomaiya यांना कशी मिळाली याची चौकशी झाली पाहिजे. https://t.co/vIAgAIftnM pic.twitter.com/GfKMXBzbXm
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 24, 2022
जितेंद्र आव्हाड
- “नगरविकास खात्याने हे तपासून पहावं.
- फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात.
- जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही.
- दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही म्हणाले.
आघाडी सरकारला भीती कसली आहे? सोमय्यांचा खोचक प्रश्न
- आघाडी सरकारला भीती कसली आहे? कोणत्या कोणत्या फायली तपासल्या त्याची का? वायकरांची फाईल होती की सरनाईकांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटतं बहुतेक भीती ती आहे.
- आम्हाला जगभरातून माहिती मिळत असते. वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते.
- घोटाळेबाजांची माहिती मिळते.
- उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती मिळत असते.
- मी कुठेही जाणार, जातो. माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो.
- आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्यावर धमक्यांचे, अब्रुनुकसानीचे अशा १३ केसेस लावल्या आहेत.
- माझ्यावर माझ्या कुटुंबावर चौकश्या लावल्या आहेत.
- आता आणखी एक चौकशी होऊन जाऊ दे.