Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोमय्यांच्या घोषित हल्ल्याआधीच पवारांचा प्रतिहल्ला! तरीही सोमय्यांकडून नवा आरोप आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी!!

October 13, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
kirit somaiya

मुक्तपीठ टीम

बुधवारी अजित पवारांच्या स्वाक्षरीच्या कागदपत्रांसह नवा आरोप करणार असल्याचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या घोषित हल्ल्याच्या एक तास आधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यातील हवा काढून घेण्यासाठी प्रतिहल्ला केला. पण किरीट सोमय्या तरीही स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी पवारांची पत्रकार परिषद लाइव्ह असतानाच ठरवल्याप्रमाणे अजित पवारांवर हल्ला चढवला. अजित पवारांनी भावनिक मुद्दा केला. बहिणींना लक्ष्य का केले, असे विचारले. पण मग त्यांनी बहिणींच्या नावांवर व्यवहार का केले, असा सवाल विचारला. तसेच या कागदावर जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक तेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

 

किरीट सोमय्यांचा हल्ला बोल

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे.
यावर नेटफ्लिक्सने सिरीयल बनवली, तर अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते.
यातला सिझन 1 हा अजित पवार असेल, असा टोमणा मारत किरीट सोमय्या यांनी भाष्य केले.

 

शरद पवारांनाही सोमय्यांचे उत्तर

  • पवार कुटुंबाचा हिशोब चुकता करणार, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याला किरीट सोमय्यांनी उत्तर दिलेलं आहे.
  • ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा हिम्मत असेल, तर सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक कोण आहे, हे जाहीर करावे.
  • ‘ २७ हजार सभासदांचा जरंडेश्वर कारखाना काढून घेतला.
  • उच्च न्यायालयाने जरंडेश्वर कारखाना खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं आहे. कारखाना खरेदी करताना अजित पवारांनी सगळ्या नियमांचे उल्लंघन केले आहे. म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रपदावर राहता येणार नाही.

 

नेटफ्लिक्सवर सिरीयल बनावी!

  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर असलेली भारतातील ही आयकर विभागाची सगळ्यात मोठी धाड आहे.
  • नेटफ्लिक्सने यावर सिरीयल बनवली तर, अजित पवारांना कमीत कमी 2 ते 3 कोटी रॉयल्टी मिळू शकते.
  • या सिरीयलमध्ये सिझन 1 हा अजित पवार असेल. असे किरीट सोमय्या म्हणाले.
  • त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; तसेच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार टीका केली.
  • जरंडेश्वरचे चालक कोण आहे, हे जगाला माहिती आहे. पवारांनी पदाचा गैरवापर करून अनेक कारखाने ताब्यात घेतले आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, नवाब मलिक हे सगळे एकसारखे बोलत आहेत. केवळ विषयांतर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी घोटाळ्यांबद्दल बोलावे.
  • या कंपन्यांच्या गुंतवणुकीत 57 नामी-बेनामी कंपन्या आहेत.

Tags: ajit pawarKirit Somaiyamuktpeethअजित पवारउपमुख्यमंत्रीकिरीट सोमय्यामुक्तपीठ
Previous Post

“सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का?”: अतुल लोंढे

Next Post

शरद पवारांनी उघड केली आयटीची नवी मोडस ऑपरेंडी, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य!

Next Post
sharad pawar

शरद पवारांनी उघड केली आयटीची नवी मोडस ऑपरेंडी, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!