मुक्तपीठ टीम
ठाण्यातील शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारने दिलासा देत त्यांच्या छाबय्या विंहग गार्डन या इमारतीचा दंड आणि त्या दंडातील संपूर्ण व्याज पूर्णपणे माफ केला आहे. तसेच, इमारतीला भोगावटा प्रमाणपत्र देण्यात ठाणे मनपा आयुक्तांना आदेश दिले. मात्र यावरून भाजपाचे किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि सरनाईकांवर निशाणा साधला आहे. दंड आणि व्याजाची रक्कम ४ कोटी ३३ लाख नसून २१ कोटी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. लोकांच्या अनेक योजनांसाठी तिजोरीच पैसे नसण्याचं रडगाणं गाणारं आघाडी सरकार आमदाराला कोट्यवधीचा दंड माफ करते, हे धक्कादायक मानले जात आहे.
सरनाईक शिवसेनेचे आमदार, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ!
- बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा दंड आणि व्याजही माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला.
- इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही ठाणे मनपाला देण्यात आलेत.
- मात्र, दंड आणि व्याजाची रक्कम ४ कोटी ३३ लाख नसून २१ कोटी असल्याचा आरोप भाजपाचे किरीट सोमय्यांनी केलाय.
- तत्पूर्वी सोमय्या यांनी एक पत्रक काढून “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २००८-२००९ मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली.
- ५ मजले अनधिकृत बांधले.
- २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे.
- गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे.
- त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ.
- ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार.
- परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही.
ठाण्यात सरनाईकांचं मोठा व्यवसाय पसारा
- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सरनाईकांची एकूण संपत्ती १२६ कोटी इतकी दाखवण्यात आली.
- ठाण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रविवासी प्रकल्प आहेत.
- ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री स्टार हॉटेल.
- विहंग ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी, ज्यात स्वीमिंग पूल, हेल्थ क्लब अशा सोयींचा समावेश आहे.