मुक्तपीठ टीम
गेल्या पाच दशकांपासून विशाल समुद्रात बेधडक संचार करताना ‘पन्नाशी’ आली असली तरी, शत्रुंच्या नौकांना विश्वास बसणार नाही, असा दणदणीत ‘पंच’ देण्याची क्षमता राखली आहे, ‘किलर्स’नी!
‘किलर्स’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय नौका या तलवारीसारख्या टोकदार असल्यामुळे, युद्धासाठी सज्ज असलेल्या क्षेपणास्त्रवाहू स्क्वॉड्रनने आॅपरेशन विजय, आॅपरेशन पराक्रम आणि अगदी अलीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षा स्थितीत पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या काही अंतरावर तळ ठोकला होता.
एक महावीर चक्र, सात वीर चक्र आणि आठ नौसेना पदके (शौर्य) यासह प्रतिष्ठित लढाई सन्मानांसह या स्क्वॉड्रनला गर्व आहे. कारण ते कायम किलर्सच्या शौर्याची साक्ष देतात. २२ व्या क्षेपणास्त्रवाहू व्हेसल स्क्वॉड्रनमधील सर्वात तरुण आणि सर्वात प्रेरित नौसैनिकांच्या ‘क्रू’ द्वारे चालवलेली, अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या प्राणघातक नौका, उच्च गतीने आणि स्टेल्थी स्ट्राइक करण्यासाठी कायम सक्षम आहेत. ज्यांनी ‘किलर स्क्वाड्रन’चा एक भाग म्हणून देशाची अमूल्य सेवा केली आहे तसेच शत्रूंकडून होणा-या कोणत्याही गैरप्रकारांविरुद्ध तुटून पडण्याचे आश्वासन नौदलाने राष्ट्राला दिलेले आश्वासन आहे. या निर्यभ रचनेसाठी ‘राष्ट्रपती मानक’ प्रदान करणे, हीच त्यांच्यासाठी ‘सलामी ’आहे.