Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

खेलो इंडिया स्पर्धा: महाराष्ट्राचा हरियाणात विजयी जल्लोष

June 10, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Khelo India Youth Games

मुक्तपीठ टीम

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, सायकलिंग आदी संघांनी चांगली कामगिरी केली आहे. काही खेळाडूंनी बुधवारी बारावीच्या निकालातही आपली छाप पाडली. प्रत्येक विजयानंतर हरियाणाचे मैदान विजयी जल्लोषाने दुमदुमून जात आहे.            

खेलो इंडिया युवा स्पर्धा (6)

सांघिक विजयानंतर विजयाचा जल्लोश केला जात आहे. अॅथलेटिक्समध्ये मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविल्यानंतर जल्लोषात खेळाडूंसह क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, मुख्य व्यवस्थापक अरूण पाटील, अॅथलेटिक्सचे प्रशिक्षक महेश पाटील, जयकुमार टेंबरे, खेळाडू यांच्यासह पालकही सहभागी झाले.

यांनी गाजवले बारावीचे मैदान           

दरम्यान खेळासोबतच बारावीच्या निकालातही या खेळाडूंनी आपली छाप पाडली. आयएससी पॅटर्नमधून शिकत असलेल्या आर्यन कदम याला बारावी परीक्षेच्या पहिल्या सत्रात ८२ टक्के गुण मिळाले. तर बुधवारी बारावी परीक्षेच्या निकालात आर्यन पाटील (५६ टक्के, पनवेल) आणि सार्थक शेलार (५० टक्के, कोल्हापूर) यांनीही चांगले गुण घेतले. तर आर्यन कदमने ४ बाय १०० रिलेमध्ये सुवर्ण आणि २०० मीटरमध्येही सुवर्ण कामगिरी केली आहे. आर्यन पाटीलला उंच उडीत रौप्य मिळाले. सार्थकला रिलेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. मुलींच्या संघातील वाणिज्य शाखेतील वैष्णवी कातुरे मैदान गाजवताना ६८.३३ टक्के गुण मिळवले. कॉम्प्युटर सायन्सला असलेल्या रिया पाटील ७५.१७ टक्के गुण मिळाले.

अ‍ॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच            

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सीलसिला सुरूच राहिला. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खो मध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.            

खेलो इंडिया युवा स्पर्धा (5)

जलतरणमध्ये ४०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, १०० मीटर बटरफ्लाय – अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय ४०० रिलेच्या संघाने विजेतेपदक पटकावले.            

खेलो इंडिया युवा स्पर्धा (2)

२०० मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने २०० मीटरमध्ये सुवर्ण पदक पटकावले.     

खेलो इंडिया युवा स्पर्धा (8)       

मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले.खेलो इंडिया युवा स्पर्धा (4)

पदकतालिका

  • हरियाणा  – ३३ सुवर्ण, २७ रौप्य, ३६ कांस्य (एकूण ९६)
  • महाराष्ट्र – ३० सुवर्ण,  २८ रौप्य, २५ कांस्य (एकूण ८३)
  • मणिपूर – १३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य (एकूण १८)

(ही आकडेवारी सायंकाळी सात वाजेर्यंतची आहे)


Tags: BadmintonGymnasticharyanakabaddiKhelo India Youth GamesMaharashtraMallakhambकबड्डीखेलो इंडिया स्पर्धाजिम्नॅस्टिकबॅडमिंटनमल्लखांबमहाराष्ट्रहरियाणा
Previous Post

ब्रेन ट्यूमर कसा ओळखायचा? लक्षणं आढळल्यास वेळीच उपचार करा…

Next Post

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Next Post
pohradevi Development Plan

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!