मुक्तपीठ टीम
देशातील खादीच्या विक्रीत गेल्या सहा वर्षात दुपटीनं वाढ झाली आहे. खादी ग्रामोद्योग मंडळ म्हणजेच केव्हीआयसीची उलाढाल मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ७.७१ टक्क्यांनी वाढून ९५ हजार ७४१ कोटी झाला आहे. केव्हीआयसी विविध प्रकारच्या उत्पादनांसह खादीची विक्री देखील करते. केव्हीआयसीचे अध्यक्ष व्ही.के. सक्सेना याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बातमध्ये केलेल्या खादीच्या प्रमोशनला देतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये गांधी जयंतीला लोकांना आपल्या ‘मन की बात’मध्ये खादी खरेदी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर खादीचे उत्पादन १८८ टक्क्यांनी वाढले आहे. खादी ग्रामोद्योगच्या माहितीनुसार, मन की बातच्या गेल्या भागात मोदींनी पुन्हा खादीचा उल्लेख केल्यावर ऑनलाईन खरेदीमध्ये मोठी वाढ झाली. तरुणांमध्ये खादीबद्दल आकर्षण वाढू लागले आहे. आणि आता ते फॅशनचे रूप घेऊ लागले आहे.
खादी ग्रामोद्योग मंडळ म्हणजेच केव्हीआयसीचे अध्यक्ष व्ही.के. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार आहे की, २०१४-१५ मध्ये खादीचे उत्पादन ८७९.९८ कोटी रुपये होते. सन २०१८-१९ पर्यंत खादीच्या उत्पादनात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर सन २०१४-१५ च्या तुलनेत खादीच्या उत्पादनात १८८% वाढ झाली आहे. सक्सेना म्हणाले की, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा खादीचा उल्लेख केल्यानंतर गेल्या रविवारी केव्हीआयसीच्या ऑनलाइन विक्रीत मोठी वाढ झाली.
मन की बात, खादी के साथ!
- दोन ऑक्टोबर, २०१४ रोजी पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये लोकांना खादी विकत घ्याव्यात, असे आवाहन केले.
- यानंतर खादी इंडियाची ४ ऑक्टोबर २०१४ रोजी एकदिवसीय विक्री ६६,८१ लाख रुपये होती. जे त्या काळात सर्वाधिक आहे.
- तसेच, त्यानंतर खादीच्या विक्रीत सातत्याने वाढ झाली आहे आणि आता वर्षभरात केव्हीआयसी स्टोअरची विक्री १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
- केव्हीआयसीनुसार २ ऑक्टोबर २०१९ रोजी नवी दिल्लीच्या कनाट प्लेस येथे असलेल्या खादी इंडियाची विक्री १.२७ कोटी रुपये झाली, जी आजपर्यंतची नोंद आहे.