Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“आयकर विभागाच्या छाप्यांबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा”

भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

October 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
keshav upadhye

मुक्तपीठ टीम

आयकर विभागाने महाराष्ट्रात घातलेल्या छाप्यांतून उघड झालेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या तसेच सरकार दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करते आहे , याची माहिती या छाप्यांतून उघड झाली आहे. या बाबत आघाडी सरकारने खुलासा करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

उपाध्ये यांनी सांगितले की, आयकर विभागाच्या छाप्यात सरकारे जमिनीचे हस्तांतरण तसेच सरकारी मान्यता मिळवून देण्यापर्यंतच्या कामांत मध्यस्थांची साखळी कशी गुंतलेली होती याची माहिती समोर आली आहे. सचिन वाजे या पोलीस अधिकाऱ्याचे खंडणी प्रकरण उघडकीस आले त्यावेळी भाजपाने प्रत्येक खात्यात असे किती वाजे आहेत अशी विचारणा केली होती. आयकर विभागाच्या छाप्यातून उघड झालेली माहिती पाहता असे अनेक वाजे राज्य सरकारच्या यंत्रणेत कार्यरत असल्याचे दिसत आहे. १०५० कोटींच्या व्यवहारांची माहिती आयकर खात्याला आतापर्यंत मिळाली आहे. आघाडी सरकारने या संदर्भात खुलासा करण्याची आवश्यकता आहे.

 

अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना एका पैशाचीही मदत न करणाऱ्या आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबाबत महाराष्ट्र बंद ची हाक देऊन आपला ढोंगीपणा दाखवला आहे. आघाडी सरकारला शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असता तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडले असते आणि शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले असते. मात्र मुख्यमंत्री मुंबईत घरातच बसून आहेत. आघाडी सरकारचे हे मगरीचे अश्रू आहेत. गोवारी मोर्चावर व मावळ गोळीबारावेळी राज्यात राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार होते हे जनता व शेतकरी विसरलेली नाही , असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

 

अंमली पदार्थांच्या सेवनाने उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या तरुणाईला वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ( एनसीबी ) मुंबईत एका क्रूझ वर केलेली कारवाई योग्यच आहे. अशा कारवाईला विरोध करणाऱ्यांनी तरुणाईला वाचविण्यासाठी अशा मोहिमांना तुमचा पाठिंबा आहे की नाही, याचे उत्तर द्यावे , असेही उपाध्ये म्हणाले.

 

 


Tags: BJPBJP keshav upadhyechief minister uddhav thackerayincome taxNCBआयकर विभागएनसीबीभाजपा
Previous Post

“महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे”: डॉ.नीलम गोऱ्हे

Next Post

“खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार”: उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
ajit pawar

"खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार": उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!