मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंधासह आठवड्याला दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. भाजपाने त्या निर्णयाला पाठिंबाही दिला पण त्याचवेळी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला विचारलेले पाच प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत:
- कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार?
- रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था?
- या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का?
- रुग्णांसाठी आवश्यक असलेली मदत केंद्रे व औषधे उपलब्ध करून देणारी व्यवस्था निर्माण केली आहे का?
- पैशाअभावी उपचारांविना कोणीही राहणार नाही याची हमी सरकार देईल का?
जनहितासाठी पाठिंबा पण किमान पाच प्रश्नांची उत्तरे तरी दया
◾️कठोर निर्बंधांच्या काळात कोणत्या आरोग्य सुविधांची उभारणी करणार?
◾️रोज श्रम करून कमावणाऱ्यांच्या रोजगार,कमाईची व्यवस्था?
◾️या काळात राज्यात जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता, वितरण यांविषयीचा कार्यक्रम निश्चित केला आहे का?_२— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 5, 2021