Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“अन्नत्याग करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून आघाडी सरकारला लखीमपूरच्या शेतकऱ्यांचे बेगडी प्रेम”

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

October 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp-spokeperson-keshav-upadhye-slams

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र बंद करायला निघालेल्या ढोंगी ठाकरे सरकारला लातूरमध्ये ७२ तास अन्नत्याग आंदोलन करणारे ७२ शेतकरी दिसत नाहीत का, असा खोचक सवाल प्रदेश भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 

अतिवृष्टी आणि महापुरासोबतच मानवनिर्मित संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकरी आज अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. लातूर येथे मांजरा धरणाचे पाणी चुकीच्या पद्धतीने सोडल्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही असंख्य शेतक-यांच्या शेतात पाणी शिरले. त्यातून सोयाबीन सारखी पिके उद्ध्वस्त झाली. या शेतक-यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून मिळालेली नाही. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ७२ शेतकरी ७२ तासांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले असून पंचक्रोशीतील गावांनी चूल बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला हजारो गावकरी पाठिंबा देण्यासाठी जमत असून भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाजी पाटील तसेच रमेश कराड हे उपस्थित आहेत.

 

एकिकडे शेतक-यांना शेतकरी प्रेमाचे उमाळे दाखवणारे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या एकाही नेत्याने या गावक-यांना भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. तसेच लातूरला अतिवृष्टीला मिळालेली मदत ही शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसणारी ठरली आहे.

 

लातूरसारखाच महाराष्ट्रातला शेतकरी हलाखीने त्रस्त असताना, हाताची घडी घालून व सर्वसामान्य जनतेस वेठीस धरून उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यास पाठिंबा देणाऱ्या सरकारने लखीमपूर दुर्घटनेचेही राजकारण सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला. बळाचा, सरकारी यंत्रणेचा आणि सरकारच्या आशीर्वादाने गुंडगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा वापर करून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेत दहशत माजवू पाहात असून या बंदला जनतेचा तीव्र विरोध असल्याचे सकाळपासूनच्या अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले.

 

लातूरमध्ये ७२ शेतकरी अन्नत्याग आंदोलन करत आहेत आणि शेकडो घरांमध्ये चूल बंद आंदोलन सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवून उत्तर प्रदेशातील घटनेवर बेगडी सहानुभूती दाखविणाऱ्या ढोंगी सरकारचे राजकारण उघडे पडले आहे, असे श्री उपाध्ये म्हणाले.

 


Tags: BJPBJP keshav upadhyefarmerslakhimpurlaturMahavikas Aghadi governmentकाँग्रेसराष्ट्रवादीलातूरशिवसेना
Previous Post

“शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू”: नाना पटोले

Next Post

राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही! विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये ६ रुग्ण!!

Next Post
MCR 4-8-21

राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही! विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये ६ रुग्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!