Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीकडून मंत्र्याला अटक: केजरीवाल काय करणार, ‘मान’ यांच्यासारखं की ‘ठाकरें’सारखं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
delhi aap ed case

मुक्तपीठ टीम

दिल्ली मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटकेनंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेमकं काय करणार, याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसने केजरीवाल आणि आपच्या प्रामाणिकतेवरच संशय घेण्यास सुरुवात केली असताना, केजरीवाल हे त्यांच्याच पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं अनुकरण करून जैन मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढतील की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखं तुरुंगात गेल्यानंतरही सहकारी मंत्र्यांला पदावरून काढणार नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे.

केजरीवालांचे निकटवर्तीय म्हणून सत्येंद्र जैन यांची ओळख!!

  • नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे.
  • सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
  • हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ही कारवाई केली आहे.
  • ईडीनं सत्येंद्र जैन यांची यापूर्वी चौकशी केली होती.
  • सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची सपत्ती तात्पुरती जप्त केली.
  • ईडीनं ४ कोटी ८१ लाख रुपयांची संपत्ती जप्त केली होती.
  • मेसर्स अकिंचन डेव्हलपर्स, मेसर्स इंडो मेटल इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेडवर मनी लाँड्रिंग कायदा २००२ नुसार कारवाई करण्यात आली.

आम आदमी पक्षाची सत्येंद्र जैन यांच्या अटकेवर भूमिका!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सोमवारी सांगितले की, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने आठ वर्षे जुन्या “बनावट” प्रकरणात अटक केली आहे. कारण ते हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे प्रभारी आहेत आणि भाजपाला तिथे आपमुळे पराभवाची भीती आहे.

हिमाचल गमावण्याच्या भीतीने अटक! – सिसोदिया

सिसोदिया यांनी ट्वीट करत सांगितले की, “सत्येंद्र जैन यांच्यावर आठ वर्षांपासून खोटा खटला चालवला जात आहे. आतापर्यंत ईडीने त्यांना अनेकवेळा बोलावले. दरम्यान, ईडीने अनेक वर्षे काहीही न मिळाल्याने बोलवण्याचे बंद केले. आता पुन्हा सुरुवात झाली कारण सत्येंद्र जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत. सिसोदिया यांनी दावा केला की, “भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये वाईटरित्या पराभूत होत आहे. त्यामुळे हिमाचलला जाऊ नये म्हणून सत्येंद्र जैन यांना आज अटक करण्यात आली आहे. प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याने ते काही दिवसांतच सुटतील.

आपच्या बदनामीसाठी कारवाई – संजय सिंह

राज्यसभा सदस्य संजय सिंग म्हणाले, “केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर, जैन यांना आता ईडीने ‘आप’ला बदनाम करण्यासाठी निराधार प्रकरणात अटक केली आहे.” दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिसोदिया आणि इतर मंत्र्यांवरील छाप्यांचा संदर्भ देत सिंह म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा आप आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आम आदमी पार्टी हिमाचल प्रदेशची निवडणूक जोरदारपणे लढवेल. इतर आप मंत्री आणि आमदारांप्रमाणेच जैन यांना सर्व आरोपातून मुक्त केले जाईल, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

ईडीने २०१८ च्या प्रकरणासंदर्भात जैन यांची चौकशी केली होती. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका या वर्षी होणार आहेत. पंजाबमधील विजयानंतर आम आदमी पक्ष हिमाचलमध्येही प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

तपासात सहकार्य न केल्याने अटक – ईडी

  • मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीत ईडीला सहकार्य न केल्यामुळे सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे.
    या प्रकरणात जैन यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी तपासात त्यांना सहकार्य केले नाही आणि तपास यंत्रणेला त्यांना अटक करण्यास भाग पाडले.

केजरीवाल काय करणार…मान मार्ग की ठाकरे मार्ग?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यावर भष्ट्राचाराविरोधात कारवाई केली. आरोग्य मंत्री विजय सिंगला यांनी एका अभियंत्याकडे लाच मागितल्याची तक्रार समोर येताच मान यांनी पुरावे तपासून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. तसेच मंत्री आणि ओएसडीविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देत अटक करु दिले. त्यांच्या भूमिकेचे कौतुक स्वत: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरवींद केजरीवाल यांनी केलं होतं. याउलट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांनी त्यांच्या पक्षाचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हाही नसताना केवळ आरोप होताच, त्यांना मंत्रिमंडळातून काढले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिमशी कनेक्शनचे गंभीर आरोपांसह गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. त्यामुळे आता केजरीवाल आपल्या पक्षाच्या मान यांच्या मार्गावर जातात की ठाकरेंच्या मार्गावर असा प्रश्न विचारला जात आहे.


Tags: aaparvind kejriwalBhagwant Maancm uddhav thackeraydelhiMaharashtraSatyendar Jainअरवींद केजरीवालआपआरोग्यमंत्री सत्येंद्र जैनदिल्लीपंजाबभगवंत मानमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

स्पाइसजेटच्या वैमानिकांना योग्य प्रशिक्षण न दिल्याबद्दल स्पाइसजेटला १० लाखांचा दंड!

Next Post

एक देश, एक समान शिक्षण! होईल का बदल?

Next Post
Education

एक देश, एक समान शिक्षण! होईल का बदल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!