Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आगीचा थरार असणारी नगरच्या कौठेवाडीची यात्रा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kath Yatra in Biroba tempe At Kauthewadi

मुक्तपीठ टीम

अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावाच्या बिरोबाच्या यात्रेत एक वेगळाच थरार पाहायला मिळाला. ही यात्रा कठ्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असून डोक्यावर लाल निखाऱ्याची तेवत असलेली मातीची घागर डोक्यावर घेऊन भाविकांची बिरोबाच्या मंदिराला फेरा मारण्याची प्रथा शेकडो वर्षापासून चालत आली आहे. अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी हा थरार पाहण्यासाठी मोठा जनसुदाय कौठेवाडी गावात रात्री जमा होता.

यात्रेची परंपरा कशी आहे?

  • महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं आणि तेथील भागातील देवस्थानांची प्रथा परंपरा ही अनोखीच असते.
  • अशीच एक प्रथा अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी अकोले तालुक्यातील कौठेवाडी गावच्या यात्रेत बघावयास मिळाली.
  • यंदा कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यात्रा भरल्याने मोठी गर्दी झाली होती याच बरोबरीने कठ्यांची संख्याही ९१ होती.
  • डोक्यावर पेटलेले कठे. त्यातून उसळणाऱ्या तप्त ज्वाला. शरीरावर ओघळणारे उकळत तेल. मंदिरात अविरतपणे सुरू असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष. संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, ताशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरू असलेला गजर आणि
  • अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध चित्कार करत लोक बिरोबाचा गजर करतात.

कठा म्हणजे काय?

  • कठा म्हणजे बुडाच्या बाजूने कापलेली मातीची घागर माठ असते.
  • कापलेला भाग या घागरीत आतल्या बाजूला उघडा करून ठेवला जातो.
  • त्यात खैराची ढणढणत्या पेटणाऱ्या झाडांची लाकड उभी केली जातात.
  • त्यात कापूस टाकत ती  बाहेरच्या बाजूने नवीन कोऱ्या कपड्याने त्याला घट्ट बांधाली जातात.
  • त्याला फुलांचा हार तसेच इतर आकर्षक सजावट करुन मंदिरासमोर हे कठे ठेवले जातात.
  • दर्शनसाठी आलेले अनेक भाविक या कठ्यांवर थोड थोड तेल टाकत राहतात.
  • त्यानंतर साकिरवाडी गावाला मान असलेली कठी मंदीरात रात्री नऊला पोहोचल्यानंतर हे कठे पेटवले जातात.
    हे पेटलेले आणि धगधगणारे कठे डोक्यावर घेऊन हाई हाईचा आवाज करत भक्तगण मध्यरात्रीपर्यंत बिरोबाच्या मंदिराला फेऱ्या मारतात.

भाविकांची धारणा-

  • कठा घेतलेला अंगात वार आलेला भक्त खाली गुडघ्यावर वाकला की त्या धगधगत्या काठ्यात त्याचा साथीदार तेल टाकतो तर एक साथीदार  कठ्यातील तप्त हा सगळा थरार रात्री बारा वाजे पर्यंत चालत असतो.
  • कठ्यातील निखाऱ्याने अथवा तप्त तेलाने एखाद्या भाविकालाही इजा होत नाही. यात काही अंधश्रद्धा नसून केलेला नवस पूर्ण झाल्यावर नवस पुर्तीसाठी कठा तयार केला जातो.
  • तसेच आगीची घागर डोक्यावर घेणाऱ्या भक्तांच्या अंगात बिरोबाचे संचार झालेला असतो, अशी धारणा भाविकांची आहे.

कठा परंपरेचा इतिहास!!

  • ही प्रथापंरा कधी सुरू झाली याच्या काही अख्याईका सांगीतल्या जातात.
  • त्यातील एक मोहल कालीनही आहे.
  • जुने जाणत्यांच्या मते हे बिरोबा देवस्थान मोगलांच्या काळातील आहे.
  • शिवनेरी किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हा लोक सैरावैरा पळू लागले.
  • तेव्हा काही लोक कौठेवाडी येथे आले आणि येताना आपला दगडरुपी देव घेऊन आले.
  • नंतर सर्व शांत झाल्यावर ते पुन्हा जावू लागले तेव्हा लहानसा दगड काही केल्याने हलेना.
  • तेव्हा हा प्रांत जाहगिरी खाली होता.
  • येथील जाहगिरदारानं भोईर आणि भांगरे यांना येथे कसण्यास जमीन देवून येथेच स्थायिक होण्यास सांगितले तेव्हापासून ते येथे बिरोबाची पुजा करतायेत.
  • कठा परंपरा अतिशय पुरातन काळापासून सुरू असून याचे अनेक दाखले आणि अख्यायिका आहेत.
  • पुरातन काळात काही धनगर समाजाची लोक डोंगरात मेंढर चारण्यासाठी घेवून आला होती, तेव्हा त्यांच्यावर आलेल संकट बिरोबाच्या नवसान दूर झाले आणि ते भयमुक्त झाले.
  • तेव्हापासून ही महाराष्ट्रातील कठ्याची परंपरा सुरू आहे. आज मुंबई, ठाणे सह अनेक जिल्ह्यातून भाविक या यात्रेसाठी येतात.
    बिरोबाला नवस करतात आणि पूर्ण झाल्यावर नवसपुर्तीसाठी कठा अर्पण करतात.

Tags: AkoleKauthe Wadiअकोलेआगीचा थरारकौठेवाडीबिरोबा यात्रा
Previous Post

महाराष्ट्रातील २, ४८६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण किमान ५ वर्षे तरी गेले…

Next Post

राज्यात २२१ नवे रुग्ण, २११ बरे! मुंबई १२४, पुणे ४७, ठाणे १८

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २२१ नवे रुग्ण, २११ बरे! मुंबई १२४, पुणे ४७, ठाणे १८

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!