मुक्तपीठ टीम
या सुट्ट्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक पर्यटन करतानाच मस्त खादाडीही करायची असेल तर तुम्हाला देशाची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या वाराणशी शिवाय पर्याय नाही. काशीनगरीचे हेच वैशिष्ट्य लक्षात घेत आयआरसीटीसीने खास पॅकेज ऑफर केले आहे.
सुट्टीत भटकण्यासाटी वाराणसी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. वाराणसी हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. हे शहर ‘भारताची सांस्कृतिक राजधानी’ म्हणूनही ओळखले जाते. ‘मंदिरांचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेले वाराणसी हे असे शहर आहे जे नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करते. आयआरसीटीसी वाराणसीला भेट देणाऱ्यांसाठी अतिशय आलिशान टूर पॅकेज देत आहे. आयआरसीटीसीने या टूर पॅकेजला वाराणसी दर्शन वीथ गंगा स्नान असे नाव दिले आहे. जाणून घेऊया या टूर पॅकेजबद्दल.
कशी असणार काशी नगरीची टूर?
- प्रवासी वाराणसी रेल्वे स्थानकावर दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान पोहोचतील.
- प्रवासी भारत माता मंदिर, संकट मोचन मंदिर आणि हनुमान मंदिर यासारख्या काही मंदिरांना भेट देतील.
- संध्याकाळी प्रवाशांना दशाश्वमेध घाटाच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीला उपस्थित राहण्याची संधी मिळेल.
- दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवाशांना गंगेत आंघोळीसाठी नेले जाईल.
- गंगेत स्नान केल्यानंतर प्रवाशांना काशी विश्वनाथला भेट देण्याची संधी मिळेल.
- दर्शनानंतर प्रवाशांना पुन्हा परतण्यासाठी वारणासी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर सोडले जाईल.
किती पैसे भरावे लागतील?
१ रात्र २ दिवसांच्या या लाराणसी दौऱ्यासाठी ३७५० रुपये भरावे लागतील.