Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षक साहित्यिकाची संवेदनशीलता, कोरोनानं अनाथ झालेल्यांचं शैक्षणिक पालकत्व!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
शैक्षणिक आधार

मुक्तपीठ टीम

पुणे येथील जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक व्याख्याते जगदीश ओहोळ हे शिक्षक तर आहेच पण साहित्यिकही आहेत. संवेदनशील मनाचा हा तरुण महाराष्ट्रभर व्याख्यानांसाठी फिरतो. कोरोना संकटात पालक गमावलेल्या अनाथ मुलांचा प्रश्न समोर येताच त्यांनी जगदीशब्द फाउंडेशनच्या माध्यमातून दत्तक योजना राबवली. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सोगाव(प) व शेटफळ या गावातील एकूण तेरा बालकांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारत त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप केले व त्यांना पुढे दहावीचे शिक्षण होईपर्यंत शैक्षणिक व आर्थिक मदत करण्याचे ठरवून शैक्षणिक दत्तक घेतले आहे.

 

या वेळी सोगाव येथील पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सोगाव ग्रामपंचायत येथे करण्यात आले. शेटफळ येथील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी भेट देऊन साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच पुष्पलात गोडगे, सरपंच प्रतिनिधी स्वप्नील गोडगे, जगदिशब्द फाउंडेशनचे संस्थापक व व्याख्याते जगदीश ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र पोळ, ग्रामपंचायत सदस्य भगवान निवृत्ती बरडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोडगे, चंद्रकांत गोसावी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, मनोज घनवट, तुळशीदास सरडे, जितेश कदम, तुळशीदास गोडगे, जुनी पेन्शन संघटनेचे सोलापूर जिल्हा संस्थापक अध्यक्ष नवनाथ धांडोरे, वांगीचे उपसरपंच ज्ञानेश्वर ढावरे आदी जण यावेळी उपस्थित होते.

 

ज्या विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचा कोरोना काळात मृत्यू झाला, अशी बालके शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, शालाबाह्य होऊ नयेत. त्यांना अशा वाईट काळात आर्थिक हातभार द्यावा व मानसिक बळ द्यावे या उदात्त हेतूने जगदिशब्द फाउंडेशन ने अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.

 

सोगाव(प) येथील शैला(६ वी) , भक्ती(५ वी), गौरी(३ री), योगिता(१ ली), अंजली(१० वैशाली(८ वी), सोमनाथ(४ थी), कृष्णा(२ री), ज्ञानेश्वर(अंगणवाडी) तर शेटफळ येथील कु.शिवरुद्र(! ली) स्वरांजली(अंगणवाडी) व ओंकार यांस फाउंडेशन च्या वतीने दर्जेदार शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

 

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक असणारे गाव म्हणजे करमाळा तालुक्यातील सोगाव हे गाव आहे. म्हणून या गावात एक सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, आई, वडील हरवलेल्या पाल्यांना ऊर्जा मिळावी, ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत या हेतूनेही सोगाव येथील या पाल्यांना आधार देला जात आहे.

 

गावगाड्यातील गरजूंना शैक्षणिक आधार!

व्याख्यानांसाठी राज्यभर फिरत असताना मनात विचार येतो की, महामानवांचे व इतर आपण जे विचार जगासमोर मांडतो त्या सर्व विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणे गरजेचे आहे आणि ती प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही ‘जगदिशब्द फाउंडेशन’ ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून शिक्षण हे आमच्या कार्याचे मुख्य क्षेत्र असणार आहे. गावगाड्यातील गरजू, कष्टकरी, उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवित आहोत. भविष्यात हे कार्य राज्यभर करू!

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Corona orphansEducational supportJagadishabda Foundationjagdish oholmuktpeethpunesolapurजगदीश ओहोळजगदीशब्द फाउंडेशनपुणेशैक्षणिक आधारसोलापूर
Previous Post

राज्यात १,७१५ नवे रुग्ण, तर २,६८० घरी परतले! २६ जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही!!

Next Post

आयआरसीटीसीसोबत चला काशीला, गंगास्नानासह संपूर्ण सांस्कृतिक नगरीचे दर्शन

Next Post
irctc kashi

आयआरसीटीसीसोबत चला काशीला, गंगास्नानासह संपूर्ण सांस्कृतिक नगरीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!