Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काशीमध्ये ग्लोबल परिषदा शक्य, जपानचं रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kashi

मुक्तपीठ टीम

भारत आणि जपानच्या शेकडो वर्ष जुन्या मैत्रीचे प्रतीक असलेले रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र काशी नगरीत तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्याचं उद्घाटन करणार आहेत. हे अधिवेशन केंद्र १८६ कोटी रुपये खर्चून बांधले आहे. रुद्राक्ष जपानी शैलीने सजविण्यात आले आहे. जपानी फुलांचा सुगंध रुद्राक्षात दरवळत आहे. पंतप्रधान रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरच्या आवारात रुद्राक्ष रोपांची लागवड करणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, रुद्राक्ष अधिवेशन केंद्रात इन्डो-जपान कला व संस्कृतीची झलकदेखील पाहायला मिळणार आहे.

 

जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वांत चैतन्यशील शहर, काशीला जपानकडून भारताला मैत्रिची रुद्राक्षच्या रूपात, मैत्रीची अनोखी भेट दिली आहे. जिथे संगीत मैफिली, परिषद, नाटक आणि प्रदर्शन यासारखे कार्यक्रम आयोजित करता येतील. २०१५मध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ असणाऱ्या काशीत आणले तेव्हा या केंद्राची पायाभरणी झाली होती. शिवलिंगाच्या आकाराच्या या केंद्राचे नाव शिवनगरी काशीमुळे रुद्राक्ष ठेवण्यात आले आहे. त्यात स्टीलचे १०८ रुद्राक्ष बसविण्यात आले आहे.

 

जपानच्या मैत्रीचं प्रतीक, जर्जा ग्लोबल!

  • वाराणसीतील सिगरा येथे तीन एकरच्या परिसरात १८६ कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या रुद्राक्षमध्ये १२० गाड्यांचे पार्किंग बेसमेंट असू शकते.
  • तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर एक हॉल असेल, ज्यामध्ये व्हिएतनाममधून आयात केलेल्या खुर्च्यांवर १२०० लोक एकत्र बसू शकतात.
  • अपंगांसाठी दोन्ही दरवाज्याजवळ ६-६ व्हील चेअरची तरतूद आहे.
  • याशिवाय स्वच्छतागृहे दिव्यांगांनाही वापरा येतील अशी आहेत.
  • याशिवाय आधुनिक ग्रीन रूमही बांधली गेली आहे.
  • १५० लोकांची क्षमता असणारे दोन कॉन्फरन्स हॉल किंवा गॅलरी देखील आहेत.
  • जे जगातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
  • जपान आंतरराष्ट्रीय सहकार एजन्सीकडून रुद्राक्षला वित्तपुरवठा होतो.
  • हे डिझाईन जपानी कंपनी ओरिएंटल कन्सल्टंट ग्लोबलने केले आहे.
  • हे बांधकाम जपानच्या फुजिता कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीद्वारे देखील केले गेले आहे.

‘रुद्राक्ष’मध्ये पर्यावरण आणि सुरक्षेचीही काळजी!

• रुद्राक्षमध्ये एक छोटी जपानी बाग बांधली गेली आहे.

• ११० किलोवॅट क्षमतेच्या वीजनिर्मितीसाठी सोलर प्लांट बसविण्यात आला आहे.

• व्हीआयपी कक्ष आणि त्यांच्या येण्या-जाण्याचे मार्गही वेगळे आहेत.

• रुद्राक्ष वातानुकूलित ठेवण्यासाठी, इटालियन उपकरणे बसविली गेली आहेत.

• भिंतीवरच्या विटादेखील उष्णता रोखतात

• उत्पादन आणि वापराचे घटक लक्षात घेऊन रुद्राक्षला ग्रीन रेटिंग फॉर इंटिग्रेटेड हॅबिटेट असेसमेंट (ग्रिहा) कडून ग्रेडिंग तीन मिळाली आहे.

• रुद्राक्षात कॅमेऱ्यासह सुरक्षेची जबरदस्त बंदोबस्त करण्यात आला आहे.

• अग्निसुरक्षा उपकरणांवरही विशेष लक्ष दिले गेले आहे.

• त्याचे बांधकाम १० जुलै २०१८ रोजी सुरू झाले होते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Kashi Rudraksh convention centreprime minister narendra modiजपानचे पंतप्रधान शिंजो आबेपंतप्रधान नरेंद्र मोदीभारत आणि जपानरुद्राक्ष आंतरराष्ट्रीय अधिवेशन
Previous Post

व्यवसाय करतानाच तरुणांना व्यवसायाभिमुख बनवणारे पंचवटी अमृततुल्य

Next Post

स्वच्छता आणि देखभाल, शूर वीरांच्या पुतळ्यांसाठी एनसीसी सज्ज

Next Post
NCC

स्वच्छता आणि देखभाल, शूर वीरांच्या पुतळ्यांसाठी एनसीसी सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!