मुक्तपीठ टीम
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. पण त्याआधी कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. १० नगरपालिकांसाठी पार पडलेल्या निवडणुकांमधील ७ नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे. तर भाजपाला फक्त एका नगरपालिकेवर विजय मिळवता आला.
काँग्रेसने तब्बल ११९ जागा जिंकल्या आहेत, तर भाजपाने केवळ ५६ जागा आणि देवेगौडांच्या जनता दल (एस)ने ६७ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी “ही वेळ विजय साजरा करण्याची नसून या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा करण्याची आहे, त्यामुळे जमेल तेवढी जनसेवा करा”, असे आवाहन केले आहे.
डी.के. शिवकुमार यांचे ट्विट
• काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी एक ट्विट केले आहे.
• त्यामध्ये त्यांनी लिहिले की, १० नगरपालिका निवडणुकीत काँग्रेला ७ जागांवर विजय मिळाला आहे.
• भाजपा एका जागेवर विजय मिळवू शकली.
• काँग्रेस पक्षावर कर्नाटकातील जनतेने दाखलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
Congress has won 7 out of the 10 Urban Local Bodies that went to polls. BJP has won only 1.
I thank the people of Karnataka for placing their confidence in the Congress Party & punishing the BJP for its misrule.
Overall, Congress won 119 seats, while BJP won just 56 & JD(S) 67
— DK Shivakumar (@DKShivakumar) April 30, 2021