Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विवाह म्हणजे बलात्काराचा परवाना नाही!”

उच्च न्यायालयाने विवाह झाल्याचा बचाव देणाऱ्या पतीला फटकारलं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Karnataka high court

मुक्तपीठ टीम

वैवाहिक बलात्कार प्रकरणात विवाह म्हणजे पाशवी अत्याचार करण्याचा परवाना नव्हे, असं परखड मत कर्नाटक उच्च न्यायालयानं व्यक्त केले आहे. बलात्काराच्या खटल्यातून विवाहाच्या नावावर अपवाद मागणाऱ्या पतीची याचिका न्यायालयानं फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात पुरुष शिक्षेस पात्र ठरतोच मग तो पती असला तरी दोषीच ठरतो. भारतीय दंड संहिता कलम ३७५ नुसार बलात्काराच्या खटल्यातून विवाहाच्या नावावर अपवाद मागणाऱ्या पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

 

काय म्हणाले कर्नाटक न्यायालय?

  • घटनेत सर्वांना समानतेचा अधिकार असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
  • अशा स्थितीत पती शासक होऊ शकत नाही, ही जुनी विचारसरणी आणि परंपरा आहे.
  • विवाह कोणत्याही प्रकारे स्त्रीला पुरुषाच्या अधीन करत नाही. संविधानात प्रत्येकाला सुरक्षिततेचा समान अधिकार आहे.
  • न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक अत्याचारांमुळे पत्नीला मोठ्या मानसिक आघाताला तोंड द्यावे लागते. याचे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम तिच्यावर होत असतात. पतीच्या अशा गैरवर्तनामुळे पत्नीची आत्मप्रतीष्ठाची खच्ची केली जाते.
  • अशा परिस्थितीत वैवाहिक बलात्काराकडेही घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
  • अनेक वर्षांच्या मोहिमेनंतरही भारतात वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

 

विधिमंडळात यावर विचार करावा…

  • उच्च न्यायालयाने विधिमंडळाला या मुद्द्यावर विचार करण्याचा सल्ला दिला आहे.
  • आम्ही असे नाही म्हणत की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा म्हणून ओळखला जावा किंवा हा अपवाद विधिमंडळाने हटवावा.
  • परंतु या मुद्द्यावर विचार करणे आवश्यक आहे.
  • कथित गुन्ह्यांच्या कलमातून बलात्काराचा आरोप वगळल्यास तक्रारदार पत्नीला न्याय मिळणार नाही.

 

वैवाहिक बलात्कार म्हणजे काय?

  • वैवाहिक बलात्कार म्हणजे पत्नीच्या संमतीशिवाय पतीने जबरदस्तीने ठेवलेला शारिरीक संबंध.
  • वैवाहिक बलात्कार हा कौटुंबिक हिंसाचार आणि पत्नीवरील लैंगिक अत्याचाराचा एक प्रकार मानला जातो.
  • भारतात गेल्या काही वर्षांत वैवाहिक बलात्कारावर कायदा करण्याची मागणी वाढली आहे.
  • दिल्ली उच्च न्यायालयात २०१५ पासून या प्रकरणी अनेक याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
  • परंतु, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की या विषयावर कोणताही कायदा करण्यापूर्वी सर्वसमावेशक विचारमंथन आवश्यक आहे, कारण त्याचा समाजावर खोलवर परिणाम होईल.

Tags: karnatakakarnataka high courtMarital Rapeकर्नाटककर्नाटक उच्च न्यायालयवैवाहिक बलात्कार
Previous Post

टेंभू सिंचन प्रकल्पातील पाणी फेरनियोजनाचे काम अंतिम टप्प्यात- जयंत पाटील

Next Post

पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत मार्ग- संजय बनसोडे

Next Post
Sanjay Bansode

पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत मार्ग- संजय बनसोडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!