मुक्तपीठ टीम
कॉमेडी किंग कपिल शर्माने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘द कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या सुप्रसिद्ध कॉमेडी शोचा नवा सीझन लवकरच येत आहे. कपिलने आपल्या सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. त्याने स्वतःचा एक वेगळ्या अंदाजातला फोटो शेअर केला आहे. यात त्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहाला मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.
कपिल शर्माचा हा बहुचर्चित शो ५ जून रोजी बंद झाला होता. या शोची जागा सोनी टीव्हीवर इंडियाज लाफ्टर चॅम्पियनने घेतली. आता मात्र बदलेल्या कपिल शर्मासह कॉमेडी शोचा नवीन सीझन ३ सप्टेंबरला पाहायला मिळेल.
कपिलच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते आश्चर्यचकित!
- कपिल शर्माने त्याच्या नवीन लूकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची स्टाइल एकदम वेगळी दिसत आहे.
- फोटोमध्ये कपिल शॉर्ट स्पाइकी हेअरस्टाईलमध्ये डॅशिंग दिसत आहे.
- तो नेहमीपेक्षा फिट दिसत आहे. त्याने आपले वजन कमी केले आहे.
- या फोटोमध्ये कपिलची जॉलाइन अगदी स्पष्ट दिसत आहे त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास हे मुख्य कारण ठरत आहे.
या शोमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. फोटो शेअर करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नवीन सीझन, नवीन लुक.” या पोस्टला ‘डेडली लूक कपिल’ अशी कमेंट अभिनेता परमीत सेठीने दिली. गायक गुरु रंधावाने रेड हार्ट इमोजी पाठवले. हिना खानने फायर इमोजी टाकला. रिचा शर्माने कमेंट केली, कोण आहे हा देखणा मुलगा. अशा प्रकारच्या या कमेंट सध्या येत आहेत.
लवकरच कपिल चित्रपटातही झळकणार असल्याची चर्चा आहे. नंदिता दास यांच्या चित्रपटात तो दिसणार आहे असे म्हटले जात आहे. या चित्रपटात तो फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारणार आहे.