मुक्तपीठ टीम
पत्रकार आणि अँकर कपिल देशपांडे यांनी लेट्स अप मराठीच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली..
नरेंद्र फिरोदिया यांच्या सोहम ग्रुपच्या लेट्स अप मराठी, खास रे टीव्ही , कडक इन्टरटेन्मेंट , पिल्लु टीव्हीचं कंटेन आणि प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून ते आता काम बघणार आहेत..
नाशिकच्या दैनिक देशदूतमधून सुरु झालेला पत्रकारितेचा त्यांचा प्रवास गांवकरी-झी २४ तास – टीव्ही ९ असा प्रिंट-इलेक्ट्रॉनिक-डिजीटल असं पत्रकारितेतील वर्तुळ पूर्ण करुन आता पत्रकारितेला स्वल्पविराम देत त्यांनी नवीन माध्यमात भरारी घेतली आहे..
ह्या ग्रुपचंच लेट्सफ्लिक्स मराठी हे मराठीतील ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नरेंद्र फिरोदिया- राहुल नार्वेकर-अभिनेता अंकुश चौधरीची लेट्सफ्लिक्स मराठीत गुंतवणूक असणार आहे..
कपिल देशपांडेंची माध्यम वाटचाल
• झी मीडिया आणि टीव्ही ९ मराठीचे माजी पत्रकार कपिल देशपांडे यांचा मीडियात एक दशकापेक्षा जास्त अनुभव आहे.
• शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, आमिर खान, अक्षय कुमार, किच्चा सुदीप, कतरिना कैफ, काजोल, क्रिती सॅनन, आशुतोष गोवारीकरपासून अनेक नामवंत बॉलिवूड कलाकारांची मुलाखती कपिल देशपांडे यांनी घेतल्या आहेत.
• शिवाय मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका विश्वातही त्यांची उत्तम ओळख आणि संपर्क आहे.
• त्यांच्या अनुभवाच्या या शिदोरिचा निश्चितच ते नव्या माध्यमात वापर करतील..