मुक्तपीठ टीम
कंझावला येथे अंजलीला १२ किमी फरफटत नेणाऱ्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली तर अन्य एका आरोपीने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पीडित अंजली सिंह आणि तिची मैत्रिण निधी या घटनेच्या काही तास आधी एका व्यक्तीसोबत दिसत आहेत. अंजलीला तिच्या आईसाठी काहीतरी करण्याची ईच्छा होती, तिची ‘ती’ इच्छा अपूर्ण राहिली.
नवीन वर्षाच्या आनंदाचे रूपांतर आयुष्यभराच्या दु:खात…
- संवादादरम्यान कुटुंबीयांनी सांगितले की, प्रत्येक वर्षीप्रमाणे ते नवीन वर्षाच्या निमित्ताने गुरुद्वारा बांगला साहिबला जाण्याची तयारी करत होते.
- त्यानंतर अचानक अंजलीने जग सोडल्याची बातमी समोर आली.
- नवीन वर्षाच्या आनंदाचे रूपांतर आयुष्यभराच्या दु:खात झाले.
- आई रात्रभर मुलगी घरी परतण्याची वाट पाहत होती.
- सर्व लोक कॅबमध्ये एकत्र प्रवास करतील.
- जाण्याची सर्व तयारी केली होती, फक्त अंजलीची वाट पहात होते, पण तिच्या मृत्यूची बातमी आली.
अंजलीची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली…
- अंजलीची आई आजारी असल्याने तिला तिच्या आजारी आईला किडनी दान करायची होती.
- घर सांभाळण्यात व्यस्त असलेल्या अंजलीला ती संधी मिळू शकली नाही.
- अंजलीला कुटुंबाची इतकी काळजी होती की, कोरोनाच्या काळात तिच्या आईची नोकरी गेल्यानंतर तिने संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घेतली.
- घरची मोठी मुलगी असल्याने लग्नाचा प्रश्न निर्माण झाल्यावर तिने सर्वात आधी लहान बहिणीचे लग्न लावून दिले.
- मुलगी नसल्याची व्यथा व्यक्त करताना आई रेखाच्या मुलीच्या अपूर्ण इच्छा पाहून डोळ्यातून अश्रू आले.
पाच आरोपींच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची वाढ!
- रविवारी पहाटे कंझावला येथील अंजली सिंग हिच्या स्कूटीला एका कारने धडक दिली आणि तिला सुमारे १२ किलोमीटरपर्यंत खेचले.
- या घटनेत अंजलीचा मृत्यू झाला.
- गुरुवारी न्यायालयाने पाचही आरोपींच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली होती.
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, दिल्ली सरकारने अंजली सिंह यांच्या कुटुंबासाठी १० लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया मंजूर केली आहे.