मुक्तपीठ टीम
आयआयटी कानपूर आता भूकंप, हवामान बदल, आकाश गंगा यासारख्या विषयांमधील रहस्यांची माहिती देईल. आतापर्यंत ज्या विषयाची माहिती नव्हती, त्याबद्दलची माहिती आता वैज्ञानिक संशोधन करून सांगतील. हे संशोधन देशातील पहिल्या सुपर-सुपर कॉम्प्युटरच्या माध्यमातून केले जाईल. आयआयटी कानपूर येथे त्याची स्थापना झाली आहे. या संशोधनासाठी सुपर कॉम्प्युटरपेक्षा अधिक वेगवान गतीची आवश्यकता होती. यामुळेच हा सुपर-सुपर कॉम्प्युटर १.३ पेटा फ्लॉपच्या वेगाने धावेल.
इतर कोणत्याही आयआयटींप्रमाणेच आयआयटी कानपूरमध्येही समाजातील समस्या दूर करण्यासाठी सतत संशोधन केले जात असते. आता तेथिल शास्त्रज्ञ आजवर उत्तर न सापडलेल्या नैसर्गिक आपत्तींबद्दलच्या समस्यांवर संशोधन करणार आहेत. यासाठी संस्थेला एक सुपर-सुपर कॉम्प्युटर मिळाला आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्सड कम्प्युटिंग म्हणजेच सीडीएसीशी तो चालविण्यासाठी करारही झाला आहे. या सुपर-सुपर कॉम्प्युटरमुळे केवळ वैज्ञानिकच नाही तर संस्थेसह अनेक शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि ते सखोल संशोधन करू शकतील.
आयआयटी कानपूरनंतर आयआयटी रुड़की आणि आयआयटी मंडीमध्ये सुपर-सुपर कॉम्प्युटर स्थापित करण्याचीही योजना आहे. त्यामुळे तेथेही आणखी सखोल संशोधनास चालना मिळेल. आयआयटी कानपूरमध्ये या आधीही दोन सुपर कॉम्प्युटर आहेत.
पाहा व्हिडीओ: