Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जवानांसाठीच्या ऑक्सिजन प्रणालीचा शोध रुग्णांसाठीही उपयोगी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
oxygen

मुक्तपीठ टीम

 

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने, अति उंच भागात तैनात असलेल्या सैनिकांसाठी, एसपीओ2 ब्लड ऑक्सिजन सॅच्युरेशनआधारित पूरक ऑक्सिजन पुरवणारी प्रणाली विकसित केली आहे. डीआरडीओच्या बेंगलुरू इथल्या संरक्षण बायो –इंजिनीअरिंग आणि इलेक्त्रो वैद्यकीय प्रयोगशाळेने ही प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली एसपीओ2 पातळीवर आधारित पूरक ऑक्सिजन पुरवते. यामुळे एखादी व्यक्ती हायपोक्सिया म्हणजेच पेशींना पुरेसा ऑक्सिजन न मिळणे, या अनेकदा प्राणघातक ठरणाऱ्या स्थितीत जाण्यापासून वाचू शकते. सध्याच्या कोरोना काळात ही प्रणाली म्हणजे एक वरदान ठरणार आहे.

 

शरीराची उर्जेची आवश्यक गरज भागवण्यासाठी पेशींमध्ये पोहोचणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण अपुरे असणे म्हणजे हायपोक्सिया स्थिती. कोरोना विषाणू संसर्गामुळे कोरोना रुग्णामध्ये अशी परिस्थिती उद्भवते आणि सध्याच्या संकटातली ही एक महत्वाची स्थिती /लक्षण आहे.

 

या प्रणाली मधली इलेक्ट्रोनिक हार्डवेअर प्रणाली ही हवेचा दाब,तापमान आणि आर्द्रता कमी असणाऱ्या अतिशय उंच भागासाठी तयार करण्यात आली आहे.

 

मनगटावरच्या पल्स ऑक्सीमीटर मोड्यूलमधून वायरलेस इंटरफेस द्वारे ही यंत्रणा व्यक्तीची एसपीओ2 पातळी जाणते आणि सोलनॉइड व्होल्व नियंत्रित करून ऑक्सिजन पुरवठा नियमित करते. वजनाला हलक्या आणि सहज वाहून नेता येऊ शकणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरमधून नाकपुड्याद्वारे ऑक्सिजन दिला जातो. एक लिटर आणि एक किलो वजनाच्या 150 लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्रणालीपासून ते 10 लिटर आणि 10 किलो वजनाच्या 1500 लिटर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या आणि प्रती मिनिट दोन लिटर वेगाने 750 मिनिटापर्यंत राहू शकणाऱ्या अशा विविध आकारात ही प्रणाली उपलब्ध आहे.

 

स्थानिक परिस्थितीत वापरता येण्यासाठी स्वदेशात विकसित करण्यात आलेली ही प्रणाली अतिशय मजबूत तर आहेच त्याचबरोबर स्वस्तही आहे, उद्योगामध्ये याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु आहे.
सध्याच्या कोविड महामारीच्या काळात ही प्रणाली म्हणजे एक वरदान ठरणार असून मध्यम संसर्ग असणाऱ्या कोरोना रुग्णासाठी घरी नियंत्रित 2/5/7/10 लिटर प्रती मिनिट ऑक्सिजन वहन उपचार पद्धतीसाठी याचा वापर शक्य होणार आहे. एसपीओ2 कमी झाल्यास ऑक्सिमिटर धोक्याची सूचना देणार आहे. ते आपोआप ओ2 पातळी कमी/ जास्त करेल.

उपलब्धता आणि सामान्यासाठी वापरण्यासाठी सुलभ अशा या सुविधेमुळे ही प्रणाली, रुग्णाच्या एसपीओ2 पातळीवर देखरेख करण्यासाठी डॉक्टर आणि निम वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी करणार आहे.
वापरण्यासाठी सोप्या अशा ऑक्सिजन पुरवठा प्रणालीमुळे, अतिशय ताण असणाऱ्या वैद्यकीय संसाधनासाठी हे वरदान ठरणार आहे. याचा प्रसार,देशात मोठ्या संख्येने असणाऱ्या कोविड रुग्णासाठी व्यवस्थापन संकट कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: oxygen systemsoldiersडीआरडीओ
Previous Post

देशातील पहिला सुपर-सुपर कॉम्प्युटर कानपूरच्या आयआयटीत

Next Post

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
good news morning bulletin

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!