मुक्तपीठ टीम
कंगना रनौतच्या पासपोर्टवरील संकट आता दूर झालं आहे. तिच्यावरील गुन्ह्यामुळे पासपोर्टचं नुतनीकरण रखडलं होतं. आता मात्र, ते काम झालं आहे. त्यामुळे तिच्या परदेश प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ती बुडापेस्टला जाऊन ‘धाकड’च्या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे.
बदल केल्यानंतर पासपोर्ट नुतनीकरण
- कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- परवानगी मिळाल्यानंतर कंगनाने पासपोर्ट कार्यालयात जाऊन नूतनीकरणासाठी अर्ज केला होता.
- मात्र, तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने पासपोर्ट नुतनीकरण रखडले होते.
- मुंबईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या आदेशानुसार कंगनाने तिच्या पासपोर्ट अर्जामध्ये काही बदल केले.
- त्यानंतर तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले.
कंगना करणार धाकडचं शुटिंग
- आता ती लवकरच धकडच्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे
- ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टपर्यंत होऊ शकते-
- कंगना तिथे ‘धाकड’ चित्रपटाचे शूट पूर्ण करणार आहे.
- पासपोर्ट वेळेवर नूतनीकरण झाले असते तर चित्रपटाचे शूटिंग २० जूनपासूनच सुरू झाले असते.
‘धाकड’च्या दिग्दर्शकासह फोटो शेअर करुन कंगनाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने लिहिले की, ‘मला माझा पासपोर्ट मिळाला आहे. आपली काळजी आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे मी लवकरच तुझ्याबरोबर असणार आहे.’
View this post on Instagram
कंगनाचे पुढचे चित्रपट
- ‘इंदिरा’मध्ये देखील दिसणार कंगना
- ऑगस्टमध्ये कंगना पुन्हा ‘इंदिरा’ या वेब शोवर काम सुरू करेल.
- कंगना त्या शोची डायरेक्टर आहे.
- अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांप्रमाणेच आता कंगना लवकरच तिच्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करू शकणार आहे.