Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण! मनपावर दगड भिरकावण्याचा भाजपा आमदाराचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kalyan-dombiwali

मुक्तपीठ टीम

दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना अडचणीचा त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने खड्ड्यांसाठी पुरेशा निधीची तजवीज केलेली असतानाही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने खड्डे बुजवावेत अन्यथा नागरिकाच्या सहनशिलतेचा अंत झाल्यास खड्ड्यातील दगड मनपाच्या दिशेने भिरकावण्यास वेळ लागणार नसल्याचा गंभीर इशारा भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी केडीएमसी आयुक्तांना दिला आहे.

दरवर्षीच कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात मुसळधार पाउस पडत असल्यामुळे पावसाळ्यात शहरातील रस्त्यावर पडणारे खड्डे प्रशासनाच्या परिचयाचे आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी उच्च प्रतीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मास्टेक कार्पेट सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरणे सहज शक्य असताना आणि मनपा अर्थसंकल्पात खड्ड्यासाठी कोट्यावधीची तरतूद करण्यात आलेली असताना पावसाळयापूर्वीच निविदा काढून खड्डे का भरले जात नाहीत असा प्रश्न आमदार रवींद्र चव्हाण यांनी विचारला आहे. यंदा शहरात पाउस खूप उशिरा सुरु झाला असतानाही शहरातील रस्त्याची चाळण झाली असून याला कल्याण डोंबिवली मनपाचे सुस्त प्रशासन आणि बेदरकार वृत्ती जबाबदार आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काम अजूनही सुरु आहे. हा पूल ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहतूक विभागली जाऊन कोंडी कमी होऊ शकेल. यामुळे संथ पद्धतीने चाललेल्या कामाला गती दिली जावी.

खड्ड्यात पडून कल्याण डोंबिवलीतील अपघात होण्याचे प्रमाण मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक आहे. यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे, इतस्त्तः पडलेले दगड धोंडे यामुळे वाहतूक खोळंबा तर होतोच पण रस्त्यावर पसरलेल्या दगडांनी वाहनचालक गंभीर जखमी झालेत आणि नागरिकांचे बळीही खड्ड्यांनी घेतले आहेत. याकरिता मनपा प्रशासन दोषी आहेच पण दुर्दैव असे की झालेल्या घटनांमधून पालिका प्रशासन काहीच बोध घेत नाही एवढी यंत्रणा संवेदनाहीन, निष्काळजी आणि मुर्दाड झालेली आहे. यामुळेच नागरिकाचा अंत पाहू नका असेही आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.


Tags: KDMCकल्याण-डोंबिवली मनपाकेडीएमसीरवींद्र चव्हाण
Previous Post

मुंबईच्या आरे जंगलातील आदिवासींना पालक मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते खावटी अनुदान

Next Post

धर्म अर्थकारणाची दिशा ठरवतो की अर्थकारण धार्मिक तत्वांना नाकारून वा भ्रष्ट करीत पुढे जातं?

Next Post
girish jakhotia

धर्म अर्थकारणाची दिशा ठरवतो की अर्थकारण धार्मिक तत्वांना नाकारून वा भ्रष्ट करीत पुढे जातं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!