मुक्तपीठ टीम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद अपशब्द वापरत गलिच्छ भाषा बोलणाऱ्या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून जेरबंद करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्म संसदेत त्यांनी घृणास्पद वक्तव्य केलं होतं. यापूर्वी कालीचरण महाराजांवर छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या घृणास्पद भाषणासाठी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे. रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धर्मसभेतील इतर काही धार्मिक गुरुंनाही कालीचरणाच्या वक्तव्याचा तात्काळ निषेध केला होता.
नेमकं काय घडलं, काय बिघडलं?
कालीचरण यांनी २६ डिसेंबर रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झालेल्या ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेंचे कौतुक करणारी भाषा वापरली होती.
कालीचरण महाराजांना घृणास्पद भाषा भोवली
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही रायपूरच्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरण महाराज यांच्या विरोधात ठाणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
- भावना भडकवणारी भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी हिंदू संत कालीचरण महाराज, मिलिंद एकबोटे आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- एकबोटे यांच्या समस्त हिंदू आघाडी संघटनेने तो कार्यक्रम आयोजित केला होता.