मुक्तपीठ टीम
हॉलीवूडचा सुप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर सध्या वाईट परिस्थितीतून झुंजत आहे. अलीकडेच, जस्टिन बीबरने त्याच्या ‘जस्टिस’ अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. परंतु, काही दिवसांनंतर त्याने आपला दौरा पुढे ढकलला. ही बातमी कळताच जगभरात असलेले त्याचे चाहते निराशा झाले. त्याच वेळी, त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामागील कारण सर्वांना सांगितले. या व्हिडीओमध्ये त्याच्या अर्धा चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे.
व्हिडीओ शेअर करत जस्टिनचा चाहत्यांना निरोप
- जस्टिन बीबरने खुलासा केला की, तो रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याचा चेहरा अर्धांगवायू झाला आहे.
- व्हिडिओमध्ये त्याच्या स्थितीबद्दल बोलताना, गायक म्हणाला, तुम्ही बघू शकता, मी माझा एक डोळा लवत नाही.
- मला चेहऱ्याच्या एका बाजूने हसता येत नाही. माझा शो रद्द होण्याचे कारण हेच आहे. बरेच जण यामुळे निराश झाले, मी त्यांना सांगू इच्छितो की मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल.
सर्व शोज कधी होणार?
जस्टिन म्हणाला की, त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. तसेच, तो विश्रांती आणि थेरपीमुळे पॉझिटिव्ह दिसला. “सध्या मी फक्त विश्रांती घेत आहे आणि पूर्णपणे बरा होण्याचा आणि सेटवर परत येण्याचा प्रयत्न करत आहे.” तो म्हणाला. या वर्षी मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेलीला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
व्हिडिओ समोर आल्यापासून, जस्टिनच्या चाहत्यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले, “जस्टिन, शोची काळजी करू नका. तुमचे चाहते फक्त तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. मला खात्री आहे की तू लवकरच बरा होशील आणि स्टेजवर परत येशील. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. ” तर दुसर्याने लिहिले, “आरोग्य हीच संपत्ती आहे. तू लवकर बरा होवो ही शुभेच्छा. जस्टिन तुझी काळजी घे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”