Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रेस कॉन्सिलच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला! न्या. रंजना देसाई नव्या अध्यक्षा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ranjana desai first woman chief of pci

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना देसाई या शुक्रवारी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पीसीआय अध्यक्षपदासाठी ७२ वर्षीय न्यायमूर्ती देसाई यांच्या नावाला उपाध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पीसीआय सदस्य प्रकाश दुबे यांचा समावेश असलेल्या समितीने अलीकडेच मंजुरी दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे पद रिक्त होते. लवकरच परिषदेचे इतर सदस्यही नियुक्त केले जातील.

यापूर्वी न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद (निवृत्त) पीसीआयचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता यावर न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१९८६ मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती!

  • न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ रोजी झाला.
  • त्यांनी १९७० मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून कला शाखेची पदवी आणि १९७३ मध्ये मुंबईच्या गवर्नमेंट लॉ महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.
  • रंजना प्रकाश देसाई यांची १९८६ मध्ये प्रतिबंधात्मक अटकेच्या प्रकरणांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • १ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांची सरकारी वकील, अपील बाजू, मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कामगिरी!

  • ७२ वर्षीय न्यायमूर्ती देसाई या मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत.
  • १५ एप्रिल १९९६ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
  • मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशी देण्याचा निर्णय त्यांनी दिला.
  • न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी जम्मू आणि काश्मीर परिसीमन आयोगाचे अलीकडेट अध्यक्षपद भूषवले आहे.
  • रंजना देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या.
  • १३ सप्टेंबर २०११ रोजी त्याची या पदावर नियुक्ती झाली.

Tags: mumbai high courtPCIRanjana DesaiSupreme Courtप्रेस कॉन्सिल ऑफ इंडियामुंबई उच्च न्यायालयरंजना देसाईसर्वोच्च न्यायालय
Previous Post

#मुक्तपीठ #Live “२०जूनच्या पराभवाची कारणं काँग्रेस आताच सांगतेय!” : चंद्रकांत पाटील

Next Post

#मुक्तपीठ #Live जिजाऊ व्याख्यानमाला : प्रा. नितिन बानुगडे पाटील यांचे ओजस्वी प्रेरणादायी विचार

Next Post
#मुक्तपीठ #Live जिजाऊ व्याख्यानमाला : प्रा. नितिन बानुगडे पाटील यांचे ओजस्वी प्रेरणादायी विचार

#मुक्तपीठ #Live जिजाऊ व्याख्यानमाला : प्रा. नितिन बानुगडे पाटील यांचे ओजस्वी प्रेरणादायी विचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!