मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना देसाई या शुक्रवारी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. पीसीआय अध्यक्षपदासाठी ७२ वर्षीय न्यायमूर्ती देसाई यांच्या नावाला उपाध्यक्ष एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पीसीआय सदस्य प्रकाश दुबे यांचा समावेश असलेल्या समितीने अलीकडेच मंजुरी दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे पद रिक्त होते. लवकरच परिषदेचे इतर सदस्यही नियुक्त केले जातील.
यापूर्वी न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद (निवृत्त) पीसीआयचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते. आता यावर न्यायमूर्ती रंजना देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१९८६ मध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती!
- न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ रोजी झाला.
- त्यांनी १९७० मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून कला शाखेची पदवी आणि १९७३ मध्ये मुंबईच्या गवर्नमेंट लॉ महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली.
- रंजना प्रकाश देसाई यांची १९८६ मध्ये प्रतिबंधात्मक अटकेच्या प्रकरणांसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- १ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांची सरकारी वकील, अपील बाजू, मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कामगिरी!
- ७२ वर्षीय न्यायमूर्ती देसाई या मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत.
- १५ एप्रिल १९९६ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फाशी देण्याचा निर्णय त्यांनी दिला.
- न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी जम्मू आणि काश्मीर परिसीमन आयोगाचे अलीकडेट अध्यक्षपद भूषवले आहे.
- रंजना देसाई सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या.
- १३ सप्टेंबर २०११ रोजी त्याची या पदावर नियुक्ती झाली.