Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

ललित प्रभाकर, गौतमी देशपांडे म्हणताहेत आम्ही ‘जस्ट फ्रेंड’!

November 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
just friends

मुक्तपीठ टीम

आम्ही फक्त ‘जस्ट फ्रेंड’ असल्याची कबुली देण्यासाठी लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे या सुपर रोमँटिक जोडीने ‘स्टोरीटेल मराठी’ची निवड केली आहे. ‘जस्ट फ्रेंड’ असताना एकमेकांसोबत कसं रहावं? आपल्या भावना कश्या व्यक्त कराव्यात? यासाठी त्यांनी नव्या तरुणाईच्या मनाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या प्रख्यात लेखिका सायली केदार आणि गौरी पटवर्धन यांच्याकडून शाब्दिक मदत घेतली आहे. त्यांच्या प्रेमाचा हा सुपर रोमँटिक चकटदार, खुसखुशीत ऑडिओ ड्रामा स्टोरीटेल मराठीने आपल्या ऑडिओबुकमध्ये रेकॉर्ड केला आहे. सर्वांचे कुतूहल जागवत असलेला हा ऑडिओ ड्रामा आपल्याला घरबसल्या, प्रवासात किंवा इतर कुठेही असताना, आपल्या मर्जीनुसार हवे तेव्हा ‘स्टोरीटेल’वर ऐकता येणार आहे. ‘जस्ट फ्रेंड’ या नव्याकोऱ्या ऑडिओ ड्रामाच्या निमित्ताने सर्वांना वेड लावणारी ललित प्रभाकर गौतमी देशपांडे ही क्युट बबली जोडी एकत्र आली आहे.

असंख्य तरुणींच्या हृदयाची धडधड वाढविणारे लोकप्रिय अभिनेते ललित प्रभाकर आणि सर्वगुणसंपन्न बिनधास्त अभिनेत्री गौतमी देशपांडे यांनी आपल्या लालित्यपूर्ण वाचिक अभिनयातून ‘जस्ट फ्रेंड’चा सुपर रोमँटिक ऑडिओ-ड्रामा अधिकच लज्जतदार, मजेशीर आणि उत्कंठावर्धक केला आहे. मैत्री, मैत्रीतलं नातं, त्यांच्यातील रुसवे-फुगवे, प्रेम आणि प्रेमातील तरलता, त्यासोबत असलेली डिपेन्डन्सी अश्या अनेक प्रेमळ नाजूक क्षणांचे सूक्ष्म निरीक्षण करून या व्यक्तिरेखा खुलविण्यासाठी या जोडगोळीने विशेष मेहेनत घेतली आहे. आदिती आणि चिराग या प्रमुख पात्रांचं सादरीकरण करताना ललित आणि गौतमी यांच्यातील उत्कठ बॉंडिंग दिसून येते. या दोन्ही व्यक्तिरेखा ते पुरेपूर जगले आहेत असे ‘जस्ट फ्रेंड’ स्टोरीटेलवर ऐकणाताना जाणवत राहते.

आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?

लेखिका गौरी पटवर्धन यांनी स्टोरीटेलसाठी लोकप्रिय अभिनेते ‘सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर यांच्या आवाजामधील लोकप्रिय ‘हौस हजबंड’, मृण्मयी गोडबोले स्वानंदी टिकेकरसह ‘फिरंग’, तसेच नेहा अष्टपुत्रेसह ‘चिडका बिब्बा’, ‘रोकू बंद पडला’, ‘अळी आणि कोळी’, शेतातून ताटात, कल्पेश समेळसह मंकूचं झाड’, सौरभ गोगटेसह ‘डॉल हाऊस’, स्वप्नाली पाटीलसह ‘तो ती आणि तिचा तो’, मेघना एरंडेसह ‘बाहुलीचं लग्न’, मिशन हिमालय, ‘ऍडव्हेंचर काश्मीर’ इत्यादी ऑडिओ सिरीज लिहिल्या आहेत तर लेखिका सायली केदार यांनी नुकतीच सुपरहिट झालेली अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या कल्पक वाचिक अभिनयाने नटलेली ‘केस ००२’ व अभिनेत्री स्मिता तांबे यांच्यासह ‘केस ००१’ अभिनेत्री अक्षया देवधर हिच्या आवाजातील ‘झोलर’, स्वप्नाली पाटील, सिध्दार्थ चांदेकरसह ‘चित्रकथा’ स्वानंदी टिकेकर, अंगद म्हैसकर, सायली पाठक, पुष्कराज चिरपुटकरसह ‘टू टायमिंग’ भाग १ व २ चे लेखन केले आहे. स्वतंत्रपणे लिखाण करणाऱ्या या दोन प्रतिभावंत लेखिका ‘जस्ट फ्रेंड’ नव्या ऑडिओ सिरीज निमित्तानं प्रथमच एकत्र आल्याने एक अभिनव कलाकृतीची निर्मिती झाली आहे.

‘जस्ट फ्रेंड’ हा ऑडिओ ड्रामा ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.


Tags: Audio dramagautami dshpandejust friendlalit prabhakarStorytell marathiऑडिओ ड्रामागौतमी देशपांडेजस्ट फ्रेंडललित प्रभाकरस्टोरीटेल मराठी
Previous Post

भारतीय लष्कराच्या सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत २०० जागांसाठी भरती

Next Post

दिवाळीनंतरही नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच…‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

Next Post
Nawab Malik Shares Wankhede's nikah Photo

दिवाळीनंतरही नवाब मलिकांची फटाकेबाजी सुरुच...‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!