मुक्तपीठ टीम
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित हे देशाचे पुढचे सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. त्यांनी पाडलेला नवा पायंडा भविष्याबद्दल नव्या आशा जागवणारा आहे. न्यायमू्र्ती ललित यांनी शाळकरी मुलांचं उदाहरण न्यायालयात दिलं. ते म्हणाले, “मुलं सकाळी लवकर ७ वाजता शाळेत जातात, तर मग आपण सकाळी लवकर काम का सुरु करु शकत नाही? त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तासभर लवकर काम सुरु केलं!
न्यायमूर्ती यू यू ललित यांनी न्यायालयाच्या कामकाजात शाळकरी मुलांचा उल्लेख केला . ते म्हणाले, सकाळी सात वाजता मुले शाळेत जाऊ शकतात, मग आम्ही का नाही लवकर येऊ शकत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नेहमीपेक्षा एक तासापूर्वी कामाला सुरुवात केली. जे लोक वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत किंवा ठरलेल्या वेळेपूर्वी काम टाळतात त्यांच्यासाठीही न्या. ललित यांचा हा सल्ला आहे. न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने सकाळी साडेनऊ वाजता या प्रकरणांची सुनावणी सुरू केली. साधारणपणे न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा वाजता सुरू होते.
न्यायमूर्ती ललितांचे लवकर काम, लवकर आराम!
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत खटल्यांची सुनावणी करतात.
- त्याऐवजी काम लवकर सुरू केले तर संध्याकाळी त्याचा फायदा होईल
- न्यायालयाचे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ सकाळी ९.३० आहे, असे मला म्हणायचे आहे.
- दुसऱ्या दिवशीच्या खटल्यांचा अभ्यास करण्यासाठी संध्याकाळी अधिक वेळ मिळेल.
- न्यायालये सकाळी ९ वाजता कामकाज सुरू करू शकतात आणि ११.३० वाजता एक तासाच्या विश्रांतीसह दुपारी २ वाजेपर्यंत दिवसाचे कामकाज संपवू शकतात.
- असे केल्याने न्यायाधीशांना संध्याकाळी अभ्यास वगैरे काम करण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
ललित पुढचे सरन्यायाधीश!
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर ललित हे पदभार स्वीकारतील आणि ते या वर्षी ८ नोव्हेंबरपर्यंत सरन्यायाधीश म्हणून कार्यरत राहतील.