Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल कोश्यारी व शरद पवारांना भेटणार

मराठी पत्रकार परिषदेच्या श्रध्दांजली सभेत निर्णय

May 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
s m deshmukh

मुक्तपीठ टीम

 

कोरोनानं राज्यातील १३५ पत्रकारांचं निधन झाल्यानंतरही राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपले गाऱ्हाणे घेऊन राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी ही घोषणा केली..

 

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेचा समारोप करताना देशमुख यांनी ही माहिती दिली.. सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारवरचा दबाव वाढविला पाहिजे असा आग़ह सर्वच वक्त्यांनी धरल्यानंतर राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची संयुक्त बैठक लवकरच मुंबईत बोलावण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले.. सरकार विरोधात न्यायालयात जावे अशा सूचना सातत्यानं केल्या जात आहेत त्याबाबतही वकिलांनी तसेच काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले..

 

राज्यातील पत्रकारांचे सातत्यानं बळी जात असताना देखील सरकार पत्रकारांच्या किरकोळ मागण्या देखील मंजूर करीत नाही याबद्दल सर्वच उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करीत सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आग्रह धरला..

 

टीव्हीजेए अध्यक्ष विनोद जगदाळे म्हणाले, फडणवीस सरकारने पत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायद्यासारखे काही महत्वाचे निर्णय घेतले मात्र विद्यमान सरकारने आपल्या कार्यकाळात पत्रकारांचा एकही प्रश्न सोडविला नाही हे संतापजनक आहे.. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांवर आड येणारे एक झारीतील शुक़चार्य नाही सारी झारीच शुक्रचार्यांनी भरली आहे.. पत्रकारांनी निधी उभारून गरजू पत्रकारांना मदत करावी अशी सूचना त्यांनी केली.. बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन यांनी बीयुजेच्यावतीने गरजू पत्रकारांना उपचारासाठी तर दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात असल्याचे सांगितले..

 

पत्रकार अत्यावश्यक सेवेत नाहीत आणि जीवनावश्यक सेवेतही नाहीत.. पत्रकारांना जाणीवपूर्वक टाळलं जात आहे, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासिन आणि दिशाहीन असल्याचा आरोप नवशक्तीचे संपादक नरेंद्र कोठेकर यांनी केला.

 

नवराष्ट्रचे संपादक राजा आदाटे यांनी पत्रकार संघटनांचा एक फ्रन्ट बनवून सरकारवर दबाव आणावा अशी सूचना केली.. पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे अशी सूचना करीत जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी बारा मंत्र्यांनी पत्रं लिहिल्यानंतर देखील सरकार जर निर्णय घेत नसेल तर सरकार बहुमताची कदर करीत नाही असे म्हणावे लागेल असा हल्ला केला.. लोकशाही बहुमताचा आदर करणारी हवी अवहेलना करणारी नको असे मत त्यांनी व्यक्त केले . माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी, पत्रकार संघटनांनी आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र यावे आणि सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना केली.. आजतकचे संपादक साहिल जोशी यांनी पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे यावर भर दिला.. मराठी पत्रकार परिषदेचे

 

अध्यक्ष गजानन नाईक यांनी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला तर परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनीही सर्व संघटनांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेण्याची गरज विषद केली..

 

पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले.. जान्हवी पाटील यांनी आभार मानले.. बैठकीस परिषदेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हाध्यक्ष, परिषद प़तिनिधी असे ९० पत्रकार उपस्थित होते.. तब्बल दोन तास चाललेली ही सभा नियोजनानुसार ठीक सहा वाजता सुरू झाली.. ६ वाजून पाच मिनिटांनी सभेत उपस्थित असणारांनी तसेच राज्यातील पत्रकारांनी दोन मिनिटे उभे राहून दिवंगत पत्रकारांना तसेच ज्यांचे कुटुंबिय गेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली..


Tags: nana patolencp president sharad pawarअध्यक्ष गजानन नाईकएस.एम.देशमुखनाना पटोलेसंपादक प्रसाद काथेसंपादक साहिल जोशी
Previous Post

#मुक्तपीठ सोमवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

भारतीयांना लसींसाठी प्रियांका चोप्राचं अमेरिकन अध्यक्षांना साकडं

Next Post
priyanka chopra

भारतीयांना लसींसाठी प्रियांका चोप्राचं अमेरिकन अध्यक्षांना साकडं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!