मुक्तपीठ टीम
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एएनएम या पदांवर एकूण ३४ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ११ आणि १२ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण कल्याण-डोंबिवली शहर आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार एएनएम कोर्ससह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव कॉम्प्लेक्स सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे
अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.kdmc.gov.in वरून माहिती मिळवू शकता.