मुक्तपीठ टीम
ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट पदासाठी १२ वी पास पदविकाधारकांकडून अर्ज मागविले आहेत. ऑईल इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण १२० पदांवर भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०२१ आहे.
शैक्षणिक पात्रता
• ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज केलेला उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विद्या शाखेतून पदवीधर झालेला असणे आवश्यक आहे.
• मात्र, यासाठी त्यांना पदवीला आणि दहावी, बारावीला ४० टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असावेत.
• याशिवाय उमेदवाराचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये डिप्लोमा झालेला आवश्यक आहे.
• उमेदवारांना एम एस वर्ड एक्सेल पॉवरपॉइंट ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
• १८ ते ३० वयोगटातील पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
• तर आरक्षित प्रवर्गासाठी ३५ असेल तर ओबीसी प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३३ असेल.
शुल्क
• खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचं शुल्क २०० रुपये.
• अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ईडब्ल्यूएस, दिव्यांग, माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही.
अधिक माहितीसाठी
ऑईल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट oil-india.com वरून माहिती मिळवू शकता.