मुक्तपीठ टीम
एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी भारतात नोकऱ्या देत आहे. स्पेसएक्सच्या मालकीची स्टारलिंक लवकरच देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. कंपनीचे कंट्री हेड इंडिया संजय भारद्वाज यांनी याबद्दल माहीती देताना सांगितले की “मला आनंद होत आहे की आम्ही आता भारतासाठी दोन रॉकस्टार शोधत आहोत.”
कंपनीने लिंक्डइनवर ही माहिती दिली आहे. भारद्वाज यांनी लिहिले की, “सॅटलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा उपक्रम ग्रामीण भारतातून सुरू होणाऱ्या परिवर्तनाला गती देण्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे नोकरीच्या संधी खुल्या होतील. कंपनीला परवाना मिळाल्यावर कामाला गती येईल. पात्र उमेदवार त्यांचा बायोडाटा पाठवू शकतात.”
स्टारलिंक मध्ये भरती
पद
एक्झिक्यूटिव्ह असिस्टेंट
जबाबदारी
मीटिंगचे समन्वय, कॅलेंडर व्यवस्थापन, भेटीचे नियोजन, प्रवासाचे वेळापत्रक, कार्यक्रमाची व्यवस्था, अजेंडा तयार करणे आणि आवश्यकतेनुसार एक किंवा अधिक सी-स्तरीय अधिकाऱ्यांसाठी इतर समर्थन. सर्व कायदेशीर कागदपत्रे तसेच मेल आणि ग्राहक पत्रव्यवहार वेळेवर रेकॉर्ड करा आणि वितरित करा. मीटिंग आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये स्पेस एक्स चे प्रतिनिधित्व करणे.
पात्रता
- ग्रॅज्युएशन पदवी
- कार्यकारी स्तरावर ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टूल्सचा अनुभव
- भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे आणि सध्या देखील भारताचा रहिवाशी असावा
कौशल्ये आणि अनुभव
- हाय-स्पीड स्टार्ट-अप वातावरणात उच्च-स्तरीय कार्यकारी अनुभव
- कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान असावे
- प्रोजेक्ट स्कोप डेव्हलपमेंटचा अनुभव
- प्रकल्प वेळापत्रक व्यवस्थापनाचा अनुभव
- संभाषण कौशल्य मजबूत असावे
- समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा
एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट ऑफ इंडिया या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
https://www.spacex.com/careers/index.html
डायरेक्टर ऑफ रूलर ट्रांसफॉर्मेशन या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:
https://www.spacex.com/careers/index.html?department=India?ref=inbound_article