मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौऱ्यावर असताना एक विचित्र प्रकार घडला आहे. आव्हाडांची गाडी वाहतूककोंडीत अडकल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसाने उगाच एका वाहनचालकाला हाणालं. जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला असता त्यावेळी ही घटना घडली.
नेमकं काय प्रकरण आहे?
- आव्हाड हे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले.
- दर्शन घेऊन झाल्यानंतर भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला.
- चिंचोळ्या भाऊसिंगजी रोडवर वाहतूक कोंडी ही काही नवीन बाब नाही.
- सर्वसामान्यांना दररोज कसरत करूनच वाट काढावी लागते.
- त्याच रोडवर वाहनांच्या गर्दीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.
- त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते.
- याचवेळी एका वाहनधारकाला बाजूला करताना एका पोलिसाने वाहनधारकाला उगाच हाणलं.
- हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आमचं ठरलंय!
- शिवसेना खासदार संजय शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
- या नेत्यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली.
- या भेटीवेळी जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचा हात उंचावत आमचं ठरलंय असे म्हणाले.
- त्यामुळे राऊत आणि आव्हाड नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.