Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home व्हा अभिव्यक्त!

#व्हाअभिव्यक्त! मधूर आवाजाची धार

February 8, 2021
in व्हा अभिव्यक्त!
0
rihanna jitendra awhad

डॉ. जितेंद्र आव्हाड

रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते.

 

रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. “म्युझिक ऑफ द सन” हा तिचा पहिला अल्बम २००३ साली प्रसिद्ध झाला तेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती. तो इतका गाजला आणि खपला की तिथून तिने मागे वळूनच पाहिलं नाही. आज वयाच्या ३२ व्या वर्षी ती अब्जोपती आहे. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत.

 

आपले जुने दिवस मात्र रियाना विसरलेली नाही. गरीब मुलांना शिक्षण, एड्स आणि कर्करोगाचे रुग्ण यासाठी ती खूप दानधर्म करते. एकूणच दुबळ्या घटकांबद्दलची तिची आस्था, पैसा आणि प्रसिद्धीमुळे संपलेली नाही.

 

दील्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश इथे शेतकरी आंदोलनाला चिरडण्यासाठी इंटरनेट बंद ठेवलं आहे. अमेरिकेच्या सीएनएन वृत्तसंस्थेने यावर एक सविस्तर बातमी दिली. तिचा दाखला देऊन, “आपण यावर का बोलत नाही?”, असं ट्वीट तिने काल केलं आणि भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे.

 

भक्तांची तर पार गोची झाली. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी. पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. “तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस” असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, “अबकी बार ट्रंम्प सरकार” बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या.

 

हा वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते.

 

या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण ‘डिजिटल इंडिया’ करणार म्हणे). तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे, हे रियानाने दाखवून दिलं.

jitendra awhad

(राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि राज्य मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री)


Tags: AmericaFarmer Delhi ProtestIndiajiterndra awhadkangana ranautMaster blaster Sachin TendulkarrihannaVha Abhivyaktअमेरिकाजितेंद्र आव्हाडदिल्ली शेतकरी आंदोलनबॉलिवुड अभिनेत्री कंगना रणौतभारतरिहानाव्हा अभिव्यक्त
Previous Post

मनपा निवडणुकांसाठी मनसेची तयारी, शनिवारी राज ठाकरे नवी मुंबईत

Next Post

सचिन तेंडूलकरवर भाजपची दलाली केल्याचा आरोप करत भारतरत्न काढून घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Next Post

सचिन तेंडूलकरवर भाजपची दलाली केल्याचा आरोप करत भारतरत्न काढून घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!