Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा फोन कोण टॅप करतंय?

ट्विट डिलीट, मात्र, 'मुक्तपीठ'शी बोलताना आव्हाडांचा आरोपांचा पुनरुच्चार

February 21, 2021
in घडलं-बिघडलं
0
Jitendra Awhad phone tapping

मुक्तपीठ टीम

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास यासंदर्भातलं एक ट्विट केलं होते. “विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअ‌ॅपवरही निगराणी राखली जात असल्याचं मला वाटत आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. जितेंद्र आव्हाडांनी आरोप करताना कुणाचंही नाव न घेतल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जातायत. त्यातच त्यांनी मध्यरात्रीचे ट्विट सकाळी डिलीट केले असल्याने आव्हाडांच्या फोन टॅपिंगविषयी गूढ निर्माण झालं होतं. मात्र, ‘मुक्तपीठ‘शी बोलताना आव्हाडांनी टॅपिंगच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.

 

जानेवारी २०२० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्याच एका माजी मंत्र्याने त्यांचा फोन टॅप होत असल्याचं सांगितल्याचा दावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

आता जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांनंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? आणि आव्हाडांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

Jitendra Awhad phone tapping tweet

ट्वीट डिलीट, आव्हाड आरोपांवर ठाम!

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री फोन टॅपिंग आणि व्हॉट्सअॅप पाळतीचा आरोप केला, त्यांनी तसे ट्विटरवर मांडले, अशा बातम्या आल्या. पण सकाळी ते ट्विट दिसत नाही. ते गायब झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.

आव्हाड यांनी ते ट्विट डिलीट केले असले तरी फोन टॅपिंगच्या आरोपांवर ठाम असल्याचे ‘मुक्तपीठ’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, “गेले काही दिवस क़ल सुरु होण्यापूर्वी विशिष्ट बीपचे आवाज येत आहेत. माझ्या बोलण्यावर लक्ष असावे, असे आधीही मला वाटले होते. लक्षात आले होते. मी जाहीर मांडलेही होते. आताही तोच प्रकार सुरु असावा. अर्थात कुणी लक्ष ठेवले, माझे कॉल टॅप केले, व्हॉट्सअॅपवर नजर ठेवली म्हणून मी घाबरणार नाही.”


Tags: jitendra awhadphone tappingजितेंद्र आव्हाडफोन टॅपिंग
Previous Post

#व्हाअभिव्यक्त “राजा की लोकप्रतिनिधी?”

Next Post

“भाजपा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?”

Next Post
bjp bangladeshi connection-1

"भाजपा पदाधिकारी होताच बांगलादेशी रुबल शेख वाल्याचा वाल्मिकी झाला का?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!