मिक्तपीठ टीम
ठाण्यातील रेतीबंदर भागातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गांवर पादचारी पूल बनवण्याचे काम अद्याप झालेले नाही. तेथे पादचारी पूल नसल्याने लोकांना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यातून आजवर किमान पन्नास बळी गेले आहेत. रेल्वेच्या या बेदरकार कारभाराबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जर रेल्वेने त्वरित रेतीबंदर पादचारी पुलाचे काम सुरु केले नाही तर, पाचव्या- सहाव्या मार्गांचे कामच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रेल्वे पुलासाठी आव्हाड आक्रमक!
- रेतीबंदर रेल्वे पुलासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.
- पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेला पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
- अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत.
गेल्या पाच वर्षात ५०जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेला आहे. - रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपुजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते.
- त्यामुळे अपघाती मृत्यूंची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल.
- पादचारी पुलाचे काम त्वरित सुरु करावे, अन्यथा, पुढील आठ दिवसात रेल्वे बंद करावी लागेल.
- रेल्वेच्या विरोधात अतिशय उग्र आंदोलन होईल. एवढेच नाही तर रेल्वेने जे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु केले आहे. ते कामही आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
@MrvcLtd @Central_Railway रेतीबंदर FOB प्रकरणी अत्यंत खोट बोलत आहे. 2017 साली सुरु झालेले काम त्यांनी बंद का ठेवले? आणि त्याला 5 वर्षे होऊन गेली. 5 वर्षांत किती माणसे मृत्यूमुखी पडली. pic.twitter.com/y9DctZbvBu
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2021
रेल्वेपुलाची जागा बदलल्याचा रेल्वेचा दावा खोटा!
- रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केला असल्याचा खुलासा केला आहे.
- याबाबत विचारले असता, रेल्वेकडून शंभर टक्के खोटे बोलले जात आहे.
- अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- रेतीबंदर परिसरात ५० लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत.
- त्यासाठी मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे.
- ठामपाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरु आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.