Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोशल मीडियावर गलिच्छ पोस्ट टाकणाऱ्या अनंत करमुसेंना मारहाण आव्हाडांना भोवली!

रात्री अटकेनंतर आव्हाडांना न्यायालयातून जामीन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jitendra awhad

मुक्तपीठ टीम

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी चांगलेच गाजले होते. उच्चशिक्षित असणाऱ्या करमुसे यांनी राजकीय द्वेषातून आव्हाडांबद्दल आक्षेर्पाह गलिच्छ पोस्ट केल्या होत्या. भाजपाकडून याप्रकरणी आवाज उठवला गेल्यानंतर आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र, कारवाई झाली नव्हती. अखेर गुरुवारी रात्री त्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मिळाला.

 

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करमुसेंना त्यांच्या घरातून स्वत:च्या घरी नेऊन मारहाण करणे भोवले आहे. त्यामुळे त्यांना अखेर अटक करून जामिनावर सोडण्यात आलं.अनंत करमुसे या व्यक्तीचं अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तत्काळ जामिनदेखील मंजूर केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती.

 

न्यायालयाकडून तत्काळ जमीन मंजूर

  • जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं.
  • तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना न्यायालयासमोरदेखील हजर केलं होतं.
  • या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तत्काळ जमीनदेखील दिला आहे.
  • जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती.

 

जितेंद्र आव्हाडांवरील आरोप

  • जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता.
  • फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता.
  • यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता.
  • नंतर या प्रकरणाचे मोठे राजकीय पडसाद उमटले होते.
  • याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.

 

ऑन रेकॉर्ड अटक दाखवली

  • जितेंद्र आव्हाड यांची अटक आणि जामीन ही घडामोड माहीत झाल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर हल्ला चढवला होता.
  • विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे प्रकरण लाऊन धरल्याने ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं.
  • आव्हाडांच्या अटकेनंतर दरेकर यांनी प्रतिक्रिया देताना ती फक्त ऑन रेकॉर्ड अशी कारवाई असल्याची टीका केली.
  • त्यांनी आघाडी सरकारवर कडवट टीका केली.
  • त्यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली ये सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
  • आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती.
  • मात्र, त्यांचंच सरकार असल्यामुळे त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नाही, असा आरोप झाला
  • मात्र आता न्यायालयाच्या काही अडचणी अल्या असतील.
  • तसेच इतर संभाव्य अडचणी आल्या असतील त्यामुळे ऑन रेकॉर्ड अटक दाखवली असेल.
  • पण सरकार यांचंच असल्यामुळे जामिनाची व्यवस्था करुन ठेवली असेल, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

Tags: BJPDr Jitendra Awhadpravin darekarthaneऑन रेकॉर्ड अटकजितेंद्र आव्हाडप्रवीण दरेकर
Previous Post

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (म्हाडा) ५६५ जागांसाठी भरती

Next Post

ज्यांची आता संधी हुकली त्यांना पुढच्या वर्षी मार्चमध्ये म्हाडाची घरं मिळवण्याची संधी!

Next Post
mhada

ज्यांची आता संधी हुकली त्यांना पुढच्या वर्षी मार्चमध्ये म्हाडाची घरं मिळवण्याची संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!