मुक्तपीठ टीम
भारतीयांसाठी आता 5G सेवेची प्रतीक्षा संपली आहे. आजपासून भारतात 5G सेवा सुरु झाली असून यूजर्सना आणखी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स जियो स्वस्त 5G-रेडी स्मार्टफोनवर देखील काम करत आहे. कंपनीने ४५ व्या एजीएममध्ये सांगितले होते की, ते एका नवीन उपकरणावर Google सोबत काम करत आहे. जियोचा 5G स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत बाजारात लॉन्च केला जाईल.
जाणून घ्या जियोचा हा स्मार्टफोन आहे तरी कसा?
- जियोच्या नवीन फोनचे कोडनेम ‘गंगा’ आहे आणि त्याचा मॉडेल नंबर LS1654QB5 आहे.
- जिओ हे डिव्हाईस LYF च्या भागीदारीत लॉन्च करेल.
- 90Hz उच्च रिफ्रेश-रेटसह स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच HD + LCD डिसप्ले मिळेल.
- या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 32GB स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर मिळेल.
- मागील पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये 12MP प्राथमिक सेन्सर व्यतिरिक्त, 2MP सेकंडरी कॅमेरा असेल.
- सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
- कंपनी हा स्मार्टफोन Android 12 आधारित सॉफ्टवेअरसह लॉन्च करू शकते.
- फोनमध्ये WiFi 802.11 a/b/g/n आणि ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध असू शकते.
किती असेल या 5G फोनची किंमत?
- नवीन जियो फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तो १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये बाजारात उपलब्ध होईल.
- या डिव्हाइसची किंमत ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते.
- जियो यूजर्संना ते आणखी कमी किमतीत विकत घेण्याचा पर्याय देऊ शकेल आणि त्या बदल्यात त्यांना 5G प्लॅनचा लाभ दिला जाईल.