मुक्तपीठ टीम
रिलायन्स जियो आणि गूगलच्या भागीदारीत बनवलेला नवीन स्मार्टफोन जियोफोन नेक्स्ट गुरुवारी लाँच झाला आहे. कंपनीने आपल्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या फोनची घोषणा केली आहे. कंपनीने हा फोन खासकरुन भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये जिओ आणि गुगलचे फिचर्स आणि अॅप्स असतील. या अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गुगल यांनी संयुक्तपणे तयार केली आहे. कंपनी या स्मार्टफोनद्वारे 2 जी वापरकर्त्यांना त्याच्या 4 जी नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा आणि त्यांना इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा स्मार्टफोन स्वस्त असेल आणि १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून विक्री केली जाईल.
जियो आणि गुगल अॅप अॅक्सेस
जियो-गुगलचा परवडणार्या या स्मार्टफोनला अँड्रॉइड ओएससह जियो आणि गुगल अॅप्सचे अॅक्सेस दिले जाणार आहेत.
जियो नेक्स्टचे फीचर आणि स्पेसिफिकेशन
- जियो-गूगलचा नवीन स्मार्टफोन जियोफोन नेक्स्ट सर्वोत्तम फिचर्ससह सुसज्ज आहे.
- कंपनी या फोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक रीड-अलाउड ऑफ स्क्रीन टेक्स्ट,लँग्वेज ट्रान्सलेशन, स्मार्ट कॅमेरासह उत्कृष्ट फिचर्स ऑफर करीत आहे.
- फोनसाठी, गुगलने अँड्रॉइडची एक विशेष ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे.
किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते
- कंपनीने अद्याप जियोफोन नेक्स्टच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
- मात्र, कंपनी त्यास एक स्वस्त आणि परवडणारा स्मार्टफोन सांगत आहे.
- यावरून त्याची किंमत साडेतीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
- जियो-गूगलचा अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन जियोफोन हा पुढील गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल.
5 जी इको सिस्टम विकसित करण्यावर भर
- अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर 5 जी उपकरणे विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत आहोत.
- जियो केवळ भारताला 2G मुक्त करण्यासाठीच कार्य करत नाही तर 5 जी युक्त देखील आहे.
- डेटा वापरण्याच्या बाबतीत जियो जगातील दुसर्या क्रमांकाचे नेटवर्क बनले आहे.